Nokia 105 Classic : 999 रुपयांत मिळतोय Nokia चा मोबाईल; UPI पेमेंटही करता येणार

टाइम्स मराठी । HDM Global या Nokia ब्रँड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने भारतात Nokia 105 Classic हा मोबाईल लॉन्च केला आहे. Nokia कंपनीचा बटणाचा मोबाईल आपण यापूर्वी वापरला असेल. Nokia ब्रँडचे फोन हे भारतात बऱ्याच वर्षापासून उपलब्ध आहे. अजूनही या फोनची विक्री बऱ्यापैकी होते. परंतु आत्ता नव्याने लाँच झालेल्या या मोबाईल मध्ये तुम्ही UPI पेमेंट द्वारे एकमेकांना पैसेही पाठवू शकता. महत्त्वाचे म्हणजे या बटणाचा मोबाईलची किंमत फक्त 999 रुपये आहे. म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकाला अगदी परवडणारा असा हा मोबाईल आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल …

   

फिचर्स

Nokia 105 Classic या ब्रँडेड मोबाईलमध्ये एर्गोनॉमिक डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीने या मोबाईल फोनमध्ये अल्फान्यूमरिक कीपॅड सह इनबिल्ड UPI एप्लीकेशन उपलब्ध केले आहे. यामध्ये  वायरलेस FM रेडिओ प्रोव्हाइड  करण्यात आले असून सिंगल सिम आणि ड्युअल सिम हे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत .

बॅटरी– Nokia 105 Classic

Nokia 105 Clasic या ब्रँडेड फोनची ड्युरीबिलिटी टेस्टिंग देखील करण्यात आली. जेणेकरून कोणत्याही वातावरणाचा सामना हा फोन करू शकेल. या फोनमध्ये देण्यात आलेल्या कीपॅड वर देण्यात आलेल्या बटनांवर स्पेशल लक्ष दिले आहे. अंधारामध्ये देखील या फोनच्या माध्यमातून नंबर डायल करणे आणि टेस्ट करणे सोपे आहे. यामध्ये कंपनीने 800 mAh बॅटरी दिली आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर हा मोबाईल संपूर्ण दिवसभर आरामात चालू शकतो.

किंमत

Nokia कंपनीने  999 रुपयांच्या किमतीत  Nokia 105 Clasic हा ब्रॅण्डेड फोन लॉन्च केला आहे. या मोबाईल मध्ये कंपनीने चारकोल आणि ब्ल्यू कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. कंपनीने हा फोन चार सिंगल सिम आणि ड्युअल सिम व्हेरियंटमध्ये लॉन्च केला असून या मोबाईल वर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील देण्यात आली आहे.