Nokia 3210 तब्बल 25 वर्षानंतर ग्राहकांच्या भेटीला; मिळतात भन्नाट फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी नोकियाने आपला Nokia 3210 मोबाईल तब्बल २५ वर्षानंतर बाजारात आणला आहे. यामध्ये कंपनीने फोरजी नेटवर्क, यूट्यूब शॉर्ट्स यांसारखे अधिक नवनवीन फीचर्स दिले आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वीच मोबाईलच्या लौंचिंगबाबत कन्फर्म माहिती दिली होती. तुम्ही नोकियाचा हा 4G फीचर फोन Y2K गोल्ड, ग्रंज ब्लॅक आणि स्कूबा ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. त्याची किंमत EUR 89 (अंदाजे 8,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.आज आपण या बटणाच्या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत.

   

नोकिया 3210 चे फीचर्स –

Nokia 3210 मध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. नोकियाचा हा मोबाईल S30+ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये Unisoc T107 प्रोसेसर बसवण्यात आला असून 64MB रॅम आणि 128MB अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट पर्याय देण्यात आलाय. तुम्ही microSD च्या माध्यमातून हे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकता. पॉवरसाठी 1,450mAh बॅटरी बसवण्यात आली असून तुम्हाला यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट द्वारे मोबाईल चार्ज करावा लागेल.
कंपनीचा दावा आहे की हा फोन फुल चार्ज केल्यावर 9.8 तास चालेल.

कॅमेरा – Nokia 3210

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, नोकियाच्या या मोबाईल मध्ये पाठीमागील बाजूला 2MP रियर कॅमेरा देण्यात आलाय. यासोबत LED फ्लॅश लाईट सुद्धा उपलब्ध असेल. याशिवाय Nokia 3210 ड्युअल 4G सिम कार्ड, ब्लूटूथ 5.0, 3.5mm ऑडिओ जॅक एफएम रेडिओ, एमपी३ प्लेयर क्लाउड ॲप्स सपोर्टसह येतो. नोकियाचा हा 4G फीचर फोन Y2K गोल्ड, ग्रंज ब्लॅक आणि स्कूबा ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत EUR 89 (अंदाजे 8,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.