Nokia ने लाँच केले 2 स्वस्त Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Nokia ची मूळ कंपनी असलेल्या HMD ग्लोबलने 2 स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Nokia G310 5G आणि Nokia C210 असं या दोन्ही मोबाईलची नावे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे. हे दोन्ही मोबाईल तुम्ही अगदी सहजपणे दुरुस्त पण करू शकता. चला आज Nokia च्या या दोन्ही मोबाईलच्या किमती, त्याचे फीचर्स याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

   

Nokia G310 5G

Nokia G310 5G स्मार्टफोन मध्ये 6.5 इंच HD + V नॉच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला असून यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP, 2 MP मायक्रो कॅमेरा,2MP डेप्थ सेंसर आणि 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia G310 5G या स्मार्टफोनमध्ये Qualcomm snapdragon 480 + प्रोसेसर देण्यात आलेले असून तो Android 13 वर चालतो . या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये क्विक फिक्स डिझाईन दिलेले असून त्यामुळे युजर्सला मोबाईल फोन अतिशय सहजपणे रिपेअर करता येईल. यासोबतच स्मार्टफोनमध्ये बॅटरी डिस्प्ले आणि चार्जिंग पोर्ट इजिली रिपेअर करण्याचा ऑप्शन दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये चार जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.

Nokia C210

Nokia C210 मध्ये कंपनीने 6.3-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये Qualcomm snapdragon 662 प्रोसेसर देण्यात आलेले असून तो Android 13 वर चालतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 13MP + 2MP ड्युअल रियर दिला आहे तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरासह येतो. कंपनीने Nokia C210 मध्ये 3GB रॅम + 32GB स्टोरेज दिले आहे . तसेच यामध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली

किंमत किती?

हे दोन्ही मोबाईल सध्या अमेरिकन बाजारात लाँच झाले आहेत. यातील Nokia G310 5G या स्मार्टफोनची किंमत 186 अमेरिकी डॉलर एवढी असून भारतीय करन्सी प्रमाणे 15,500 रुपये एवढी आहे. आणि Nokia C210 या स्मार्टफोनची किंमत 109 डॉलर म्हणजे 9000 रुपये एवढी आहे.