टाइम्स मराठी । HDM Global या Nokia ब्रँड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने भारतात नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दमदार स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Nokia G42 5G असं या मोबाईलचे नाव असून कंपनीने यात तब्बल 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.
स्पेसिफिकेशन
Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट सह येत असून 720×1612 पिक्सेल रिझोल्युशन देतो. कंपनीने या मोबाईल मध्ये स्क्रीन कॉर्निंग गोरिला ग्लास 3 च्या प्रोटेक्शन दिले आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनचे बॅक पॅनल 65% रिसायकल प्लास्टिकने डेव्हलप करण्यात आले आहे. Nokia चा हा मोबाईल अँड्रॉइड 13 बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करत असून snapdragan 480 प्रोसेसरवर चालतो. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये दोन वर्षांसाठी OS अपडेट आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 20 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा सेटअप– Nokia G42 5G
Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एक रेक्टँग्युलर कॅमेरा मॉडेल देण्यात आले आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, मायक्रो कॅमेरा 2 मेगापिक्सल, आणि वेब सेंसर वाला कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मिळतो. तसेच समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
किंमत किती?
Nokia G42 5G हा मोबाईल 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच करण्यात आला असून याची किंमत फक्त 16,999 रुपये इतकी आहे. तुम्ही हा मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला कंपनीच्या ऑफिशियल साईट, ई-कॉमर्स साईट आणि रिटेल स्टोरेज वर उपलब्ध होईल.