टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Nokia भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 11 सप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Nokia G42 5G असेल. यापूर्वी हा स्मार्टफोन चुकून ॲमेझॉन वर लिस्ट करण्यात आला होता. त्यामुळे या स्मार्टफोनचे फीचर्स अगोदर पासूनच उघड झाले होते. दमदार फीचर्सने सुसज्ज असलेला नोकियाचा हा 5G स्मार्टफोन बाजारात अन्य कंपन्यांची झोप उडवेल हे मात्र नक्की. आज आपण या मोबाईल बाबत सर्व काही जाणून घेणार आहोत.
Nokia G42 5G स्पेसिफिकेशन
Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट सह येतो. या मोबाईलच्या स्क्रीनवर वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये 2.0 गीगाहर्टज प्रोसेसर उपलब्ध असून ग्राफिक्स साठी ऍड्रेनो 619GPU देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आणि स्टॉक एक्सपिरीयन्स सह उपलब्ध आहे. Nokia G42 5Gच्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यात 5000 mAh बॅटरी कंपनीने दिली असून ही बॅटरी 20 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा
Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, तसेच 2 मेगापिक्सलचा वेब सेंसर वाला कॅमेरा उपलब्ध आहे. Nokia च्या या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 6 GB रॅम हे दोन ऑप्शन देण्यात आले आहे. तसेच या मोबाईल मध्ये तुम्हाला 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.
किंमत किती?
Nokia G42 5G या स्मार्टफोनच्या किमतीसाठी कंपनीने ट्विटर अकाउंट वर एक पोल आयोजित केला होता. या पोलच्या माध्यमातून युजर्सला स्मार्टफोनच्या किमतीसाठी दोन ऑप्शन देण्यात आले होते. त्यापैकी पहिला ऑप्शन 16000 आणि दुसरा ऑप्शन 18000 रुपये. त्यापैकी पहिल्या ऑप्शनला म्हणजेच 16000 या ऑप्शनला जास्त वोट झाले. त्यानुसार कंपनी या स्मार्टफोनची किंमत 18000 रुपयांपेक्षा कमी ठेवू शकते.