Nokia ने लॉन्च केला G42 5G स्मार्टफोन; किमत पाहून आजच खरेदी कराल

TIMES MARATHI | नुकताच नोकिया कंपनीने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 6 सप्टेंबरला लॉन्च होणार होता परंतु आता हा स्मार्टफोन 11 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव Nokia G42 5G आहे. हा स्मार्टफोन रियर पॅनल आणि रिसायकल प्लास्टिकच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

   

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन

Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1612 पिक्सेल रिझोल्युशनसह 90hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. या स्मार्टफोनची स्क्रीन कॉर्निंग गोरिला ग्लास 3 च्या लेयरने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये Octacore Qualcomn snapdragan 480 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम वर आहे. कंपनीकडून या स्मार्टफोन सोबत दोन वर्षांसाठी ओ एस अपडेट आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच देण्यात येत आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यात 5000 mAh बॅटरी कंपनीने दिले आहे. ही बॅटरी 20 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Nokia G42 5G कॅमेरा सेटअप

Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एक रेक्टँग्युलर कॅमेरा मॉडेल देण्यात आले आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, मायक्रो कॅमेरा 2 मेगापिक्सल, वेब सेंसर वाला कॅमेरा 2 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम हे दोन ऑप्शन देण्यात आले आहे. म्हणजे पूर्णपणे 11 जीबी रॅम यात उपलब्ध असून 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

Nokia G42 5G किंमत

Nokia G42 5G या स्मार्टफोनच्या किमतीसाठी कंपनीने ट्विटर अकाउंट वर एक पोल आयोजित केला होता. या पोलच्या माध्यमातून युजर्सला स्मार्टफोनच्या किमतीसाठी दोन ऑप्शन देण्यात आले होते. त्यापैकी पहिला ऑप्शन 16,000 आणि दुसरा ऑप्शन 18,000 रुपयेचा आहे. त्यापैकी पहिल्या ऑप्शनला म्हणजेच 16000 या ऑप्शनला जास्त वोट झाले आहे. आता कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 12,599 रुपये एवढी ठेवली आहे. हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर 15 सप्टेंबर पासून अमेझॉनवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.