Nokia ने लाँच केले 2 मजबूत Mobile; उंचावरून पडला तरी फुटणार नाही

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने भारतीय बाजारपेठेत २ नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Nokia HHRA501x आणि Nokia IS540.1 असे या दोन्ही मोबाईलची नावे असून खास करून इंडस्ट्रियल उपयोगासाठी हे मोबाईल बाजारात आणले गेले आहेत. या मोबाईलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे मोबाईल इतके टिकाऊ आहेत कि अगदी उंचावरून जरी खाली पडले किंवा कुठे स्फोट झाला तरी फुटणार नाहीत. या स्मार्टफोनच्या डिलिवरीसाठी नोकियाने जर्मन कंपनी i.safe MOBILE Gmbh सोबत पार्टनरशिप केली आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

स्पेशलायझेशन

Nokia HHRA501x आणि Nokia IS540.1 या दोन्ही नवीन रग्ड स्मार्टफोनला EX च्या रूपात डिव्हाईड करण्यात आले आहे. यानुसार दोन्ही स्मार्टफोन एकाच टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आले असून दोन्हीही मोबाईल खान, तेल वायू आणि रसायने यासारख्या उद्योगांच्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरता येतील. हे दोन्ही मोबाईल स्फोट होण्याचा धोका असलेल्या वेगवेगळ्या स्तरावर सिक्युअरली वापरले जाऊ शकतात.

6 इंच डिस्प्ले

Nokia IS540.1 या स्मार्टफोन मध्ये NOKIA IS540.1 गोरिला ग्लास थ्री प्रोटेक्शन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 6 इंचच्या स्क्रीन सह उपलब्ध आहे. या मोबाईल मध्ये snapdragon 778 सह ड्युअल कोर क्वालकॉम QCM6490 चिपसेट देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4400 MAH बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी रिमूव्हेबल आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Nokia IS540.1 या स्मार्टफोनमध्ये ऑटो फोकस 48 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. आणि समोरील बाजूला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia IS540.1 मध्ये तुम्हाला ८ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध करण्यात आले आहे.