Mobile च्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यास स्फोट होण्याची शक्यता; वेळीच सावध व्हा

टाइम्स मराठी । आपला मोबाईल (Mobile) खराब होऊ नये या उद्देशाने मोबाईल कव्हर (Mobile Cover) आणि स्क्रीन गार्ड आपण मोबाईलला लावत असतो. मोबाईलची बॉडी सुरक्षित राहावी, त्यावर कोणतेच निशान पडू नये, या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण मोबाईल कव्हर घेत असतो. परंतु बऱ्याचदा घाई गडबडी मध्ये असल्यास आपण मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे, बस तिकीट किंवा एखादा कागद ठेवून देतो. खास करून महिला वर्गामध्ये ही सवय मोठ्या प्रमाणात आढळून येते. ऑफिसला जाताना बस मधून प्रवास करत असताना महिला पैसे मोबाईलचा कव्हर मध्ये ठेवतात. परंतु एका रिसर्च नुसार हे अत्यंत धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे.

   

एका रिपोर्टनुसार, मोबाईल फोनच्या कव्हर मध्ये जर तुम्ही पैसे तिकीट किंवा कागद ठेवत असाल तर मोबाईल फोन ब्लास्ट (Mobile Phone Blast) होण्याची शक्यता असते. मोबाईल ब्लास्ट होण्याची बरीच कारणे समोर आलेली असून त्यापैकी एक म्हणजेच मोबाईलच्या कव्हर मध्ये नोट ठेवणे. मोबाईल वापरत असताना आपला मोबाईल मोठ्या प्रमाणात गरम होतो, त्यावेळी हा मोबाईल थंड होण्यासाठी त्याला मोबाईलच्या बॅक साईडने हवा मिळत असते. परंतु मोबाईलच्या कव्हर मध्ये नोट ठेवल्यामुळे मोबाईलला थंड होण्यासाठी जागा मिळत नाही. आणि यामुळे मोबाईल ओवर हीट होतो आणि ब्लास्ट होण्याची शक्यता असते.

फक्त मोबाईलच्या कव्हर मध्ये नोट ठेवणे एवढेच नाही तर मोबाईलचे कव्हर देखील यासाठी कारणीभूत असते. जर तुमच्या मोबाईलचे कव्हर हे जाड असेल आणि तुम्ही त्यामध्ये पैसे ठेवले असतील तर वायरलेस चार्जिंग मध्ये देखील अडचणी येऊ शकतात. यासोबतच मोबाईल चार्जिंगला लावून त्याचा वापर करून हे देखील ब्लास्ट मोठं कारण आहे. मोबाईल फोनच्या कव्हर मध्ये नोट ठेवल्यामुळे नेटवर्क इशूचा देखील मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मोबाईल ब्लास्ट होण्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर चुकूनही मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे ठेवू नका. छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण आपल्या मोबाईलला होणारा धोका टाळू शकतो.