Nothing Phone 2 ची विक्री आजपासून सुरु; Flipkart वरून मिळतेय बंपर सूट

टाइम्स मराठी । बहुप्रतीक्षित Nothing Phone 2 या मोबाईलची विक्री आजपासून सुरु झाली आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून Flipkart वर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ३ व्हेरियंटसह डार्क ग्रे आणि व्हाईट या कलर ऑप्शन मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. यावेळी तुम्ही काही प्रमाणात सूटही मिळणार आहे. आज आपण Nothing Phone 2 या मोबाईलची किंमत आणि डिस्काउंट ऑफर बद्दल जाणून घेऊयात.

   

Nothing Phone 2 हा स्मार्टफोन तीन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला असून या स्मार्टफोनच्या 8GB रॅम सह 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 44,999 रुपये आहे. 12 GB रॅम सह 256 GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 49,999 रुपये आहे. तसेच 12GB रॅमसह 512 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 54,999 रुपये आहे. हा मोबाईल खरेदी करताना फ्लिपकार्ट वर तुम्हाला ऍक्सिस बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 3000 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवरून EMI ट्रांजेक्शनद्वारे 50 हजारांपेक्षा जास्त बिल भरले तर 4000 रुपयांची सूट मिळू शकते.

Nothing Phone 2 चे फीचर्स – Nothing Phone 2

हा स्मार्टफोन कंपनीच्या पहिल्या Nothing Phone 1 त्या कम्पॅरिझनमध्ये बेस्ट आहे. यामध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह 6.5 इंच फुल एचडी LTPO OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4nm वर बेस्ड स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 चिपसेट देण्यात आला आहे. एवढेच नाही तर या प्रोसेसर मध्ये ग्राफिक्स सह एड्रेनो 730 जीपीयू वापरले गेले आहे. हा स्मार्टफोन Android13 वर आधारित असलेल्या नथिंग ओएस 2.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4700mAh बॅटरी दिलेली असून ती 45W PPS वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Nothing Phone 2 या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला ड्युअल रियल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टेबीलायझेशन (OIS) मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर सेकंडरी कॅमेरा सेटअप मध्ये 50MP अल्ट्रा वाईड अँगल सह 1/2.74 इंच Sony IMX615 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी यामध्ये 32 MP f/2.45 अपर्चर वाला फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.

मोबाईलच्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, Nothing Phone 2 यामध्ये 5G, वाई-फाई 6, एनएफसी, जीपीएस, ए-जीपीएस, 4G एलटीई और यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आलं आहे. त्याचबरोबर सिक्योरिटी साठी या डिवाइस मध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा उपलब्ध आहे.