Nothing Phone 2 चा सेल ‘या’ तारखेला सुरु; पहा फीचर्स आणि किंमत

टाइम्स मराठी । स्मार्टफोन बाजारात इतर फोनला टक्कर देण्यासाठी नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) लाँच करण्यात आला आहे. येत्या २१ जुलैपासून भारतात नथिंग फोन -2 चा सेल सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्डवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये अनेक वेगवेगळे फिचर असल्यामुळे खरेदीदार फोनच्या लॉन्चिंगची खूप आतूरतेने वाट पाहत होते. आज आपण नथिंग फोन २ ची वैशिष्ट्ये आणि त्याच्या किमती बाबत जाणून घेणार आहोत.

   

६.७ इंचाचा डिस्प्ले-

नथिंग २ मध्ये कंपनीने ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन NothingOS 2.0 वर चालतो. वापरकर्त्यांना हा स्मार्टफोन ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह उपलब्ध होत आहे.

ड्युअल रिअर कॅमेरा – (Nothing Phone 2)

नथिंग फोन २ मध्ये (Nothing Phone 2) कंपनीने ड्युअल रिअल कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सरचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Nothing Phone 2 मध्ये ४,७०० mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी ४५ W च्या चार्जरला सपोर्ट करते. कंपनीकडून फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेंज देण्यात आले आहे. या मोबाईलचे डिझाइन खूपच आकर्षक असल्यानेच ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे.

21 जुलेैपासून सेल सुरु-

नुकताच (Nothing Phone 2) फोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. येत्या २१ जुलैपासून भारतीय बाजारात या फोनची विक्री सुरु होणार आहे. सुरुवातीला या फोनची किंमत ४४,९९९ हजार रुपये असणार आहे. जर तुम्ही हा फोन Axix बँक आणि HDFC बँकेचा कार्डवरुन खरेदी केला तर तुम्हाला तो आणखीन स्वस्त दरात मिळेल. म्हणजेच या फोनवर ३००० रुपयांची सुट मिळून तुम्हाला हा स्मार्टफोन ४१,९९९ रुपयांना उपलब्ध होईल.