Nothing Phone (2a) निळ्या रंगात लाँच; ग्राहकांना मिळणार 4000 रुपयांचा डिस्काउंट

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड नथिंगने आपल्या Nothing Phone (2a) चे ब्लु कलर एडिशन लाँच केले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X हँडलवर स्मार्टफोनच्या लॉन्चिंग बद्दल माहिती दिली आहे. यापूर्वी हा मोबाईल काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या व्हेरियेण्ट मध्ये लाँच करण्यात आला होता. आता तुम्ही निळ्या रंगात सुद्धा हा मोबाईल खरेदी करू शकता. त्यातच ग्राहकांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे मोबाईलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चला आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Nothing Phone (2a) मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 1300 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो. यामध्ये MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर देण्यात आला असून हा मोबाईल Android 14 वर आधारित Nothing OS 2.5 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. स्मार्टफोन मध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईलच्या समोरील बाजूला 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध आहे . पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Nothing Phone (2) ब्लू एडिशन 2 मे रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने मोबाईलच्या किमतीत कोणताही बदल केला नसला तरी पहिल्या दिवशी ग्राहकांना ४००० रुपयांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. म्हणजेच 19,999 रुपयांत तुम्ही मोबाईल खरेदी करू शकता. त्यानंतर मात्र त्याची किंमत पूर्वीसारखीच राहील. म्हणजेच 8GB + 128GB मॉडेलसाठी 23,999 रुपये, 8GB + 256GB स्टोरेज व्हेरियेण्टसाठी 25,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 27,999 रुपये असेल.