Nothing Phone 2a मोबाईल लवकरच होणार लाँच; कंपनीकडून जोरदार तयारी सुरु

टाइम्स मराठी । काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या Nothing Phone ने मार्केटमध्ये  हवा केली होती. हा मोबाईल तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात पसंत आला होता. आता कंपनी एक परवडणारा मोबाईल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Nothing Phone 2a असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने या नवीन स्मार्टफोन बाबत एक्स म्हणजेच ट्विटरवर टिजर लाँच करत माहिती दिली. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फिचर्स.

   

एक्स म्हणजेच ट्विटर या ब्लॉगिंग साइटवर कंपनीने या अपकमिंग स्मार्टफोन चा टिजर लॉन्च केला. या पोस्टमध्ये कंपनीने Nothing might announce nothing phone 2a launched this week असे कॅप्शन दिले आहे. याबाबत टिपस्टर अभिषेक यादव यांनी सांगितलं की, हा फोन लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. या Nothing Phone 2a चे बरेच फीचर्स  आणि इमेज लीक झाली आहे. त्यानुसार या फोनची डिझाईन आणि फीचर्स  उघड झाले आहेत.

डिझाईन 

Nothing Phone 2a या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये नथिंग फोन 1 प्रमाणेच डिझाईन देण्यात आली आहे. त्यानुसार यामध्ये ग्लिफ इंटरफेस असल्याचे दिसून येते. या स्मार्टफोनच्या साईड कॉर्नरला एक बॉक्सी चेसीस मिळते. या मोबाईल मध्ये nothing phone 2 पेक्षा वेगळी बॅटरी मिळू शकते.

स्पेसिफिकेशन

या अपकमिंग मोबाईलमध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. आणि या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन किंवा डायमेन्शन प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. Nothing कंपनी या स्मार्टफोनमध्ये पंच होल कॅमेरा सेटअप देऊ शकते. यासोबतच हा मोबाईल कमी किमतीमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल.