Flipkart वर Nothing Phone वर बंपर सूट; खरेदीची मोठी संधी

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सीझनचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. अशातच बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर करत असून Flipkart वर देखील काही स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. फेस्टिवल सीजन मध्ये बरेच जण मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असतात.  कारण या सीझनच्या माध्यमातून स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर मिळत असते. त्यानुसार तुम्ही देखील नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या Nothing Phone 1 आणि Nothing Phone 2 वर Flipkart वर बंपर डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. अनुसार तुम्ही हाच स्मार्टफोन कमी किमतीमध्ये घरी घेऊन जाऊ शकतात. जाणून घेऊया काय आहे ऑफर.

   

Nothing Phone 1 ऑफर

Nothing Phone 1 या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट वर बंपर डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. यासोबतच मोबाईल खरेदीवर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑफर देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 7500 रुपयांच्या डिस्काउंट ऑफरनुसार खरेदी करू शकतात.  त्यानुसार तुम्हाला हा मोबाईल 32,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. या मोबाईल वर देण्यात येणाऱ्या बँक ऑफरनुसार तुम्ही हा स्मार्टफोन ॲक्सिस बँकेच्या कार्ड वरून खरेदी करणार असाल तर पाच टक्के कॅशबॅक देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबतच EMI ऑप्शन देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

Nothing Phone 2 ऑफर

Nothing Phone 2 हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या मोबाईलच्या आठ GB रॅम आणि 12 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये एवढी आहे.  12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत 49,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट वर ऑफरच्या माध्यमातून 44 हजार 999 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकतात. या सोबतच कंपनीने बँक ऑफर देखील उपलब्ध केले आहेत. त्यानुसार तुम्ही बँक ऑफ बडोदा च्या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून हा मोबाईल खरेदी करत असाल तर तुम्हाला 10 टक्के म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

स्पेसिफिकेशन

Nothing Phone 1 या स्मार्टफोन मध्ये कंपनीने 6.55 इंच चा फुल एचडी डिस्प्ले उपलब्ध केला आहे. हा डिस्प्ले 2400 * 1080 पेक्षा रीजोल्युशन आणि 60 hz -120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले 1200 निट्स स्पीक ब्राईटनेस सह अप्रतिम विज्युअल प्रदान करतो. या मोबाईल मध्ये क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर उपलब्ध करण्यात आले आहे.

कॅमेरा

Nothing Phone 1 या मोबाईलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि सेकंडरी कॅमेरा 50 मेगापिक्सल एवढा देण्यात आला आहे. तसेच समोरील बाजूला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये 4500 mAh लिथीयम आयन बॅटरी दिली आहे.