आता नॉन युजर्सला देखील करता येणार whatsapp युजर्सशी चॅटिंग; कंपनी आणणार ‘हे’ भन्नाट फीचर

TIMES MARATHI | जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपवर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्समध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच व्हाट्सअप आता नवीन फिचर युजरसाठी उपलब्ध करून देत आहे. आता व्हाट्सअप लवकरच नवीन फिचर लॉन्च करणार आहे.

   

युरोपीय संघाच्या डिजिटल मार्केट ॲक्टच्या नियमांचे पालन करण्यासाठी व्हाट्सअप हे नवीन फिचरवर काम करत आहे. या फिचरनुसार युजर्सला थर्ड पार्टी चॅट ऑप्शन मिळू शकेल. त्यानुसार नॉन युजर्स देखील व्हाट्सअप युजर्सला मेसेज पाठवू शकतील. नॉन युजरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले हे मेसेज तुम्हाला थर्ड पार्टी चॅट ऑप्शन यामध्ये बघायला मिळतील. हे फिचर व्हाट्सअपच्या डेव्हलपमेंट वर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात येत असल्याचं Wabetainfo ने सांगितलं आहे.

नवीन फीचर कशा पद्धतीने काम करेल हे अजूनही सांगण्यात आलेले नाही. परंतु सध्या हे फीचर्स युरोपमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. बाकीच्या देशांमध्ये हे फिचर यूजर्सला मिळेल की नाही हे सांगता येऊ शकत नाही. या फीचरच्या माध्यमातून टेलिग्राम आणि सिग्नल ॲप च्या माध्यमातून युजर्स व्हाट्सअप युजर्सला मेसेज करू शकतील. म्हणजेच विदाऊट व्हाट्सअप अकाउंट देखील आता मेसेज करता येईल. सध्या व्हाट्सअपकडे युरोपीय संघामध्ये इंटरऑपरेबिलिटी सेवा प्रदान करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ आहे. त्यानुसार एका वर्षापर्यंत हे फिचर युजर्सला मिळू शकते.

युरोपच्या डिजिटल मार्केट ॲक्ट ने काही दिवसांपूर्वी अल्फाबेट अमेझॉन मेटा बाईट डान्स एप्पल मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यांना गेट कीपर्सच्या म्हणून लेबल केले होते. या सर्व कंपन्यांना एप्रिल 2024 पर्यंत नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्याचबरोबर मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सला ॲपमध्ये इंटरऑपरेबिलिटी सक्षम करावी लागणार आहे.