आता HD मध्ये ठेवा WhatsApp Status; कंपनी लाँच करणार नवं फीचर्स

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या WhatsApp मध्ये मेटा कंपनी वेगवेगळे फीचर्स ॲड करत आहे. या फीचर्स च्या माध्यमातून WhatsApp वापरताना अप्रतिम अनुभव मिळतो. या WhatsApp मध्ये  कंपनी वेगवेगळे फिचर्स उपलब्ध करत असून काही फीचर्स वर कंपनीकडून काम सुरू आहे. या फीचर्सच्या माध्यमातून WhatsApp वापरणे आणखीनच मजेशीर होईल. आता कंपनीने युजर साठी  आणखीन एक फीचर उपलब्ध केले आहे. या फीचरच्या माध्यमातून आता आपल्याला स्टेटस मध्ये HD फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येईल.

   

 काय आहे हे फीचर

 काही दिवसांपूर्वी कंपनीने व्हाट्सअप मध्ये हाय डेफिनेशन म्हणजेच HD कॉलिटी फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग बद्दल अपडेट दिले होते. या अपडेट नुसार आपण एखाद्या व्यक्तीला HD फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकतो. यातच आता आपल्याला हेच HD फोटो आणि व्हिडिओ व्हाट्सअप स्टेटस ला देखील ठेवता येतील. यामुळे स्टेटस मध्ये फोटो आणि व्हिडिओ HD क्वालिटी मध्ये दिसतील. यापूर्वी स्टेटसला ठेवलेल्या फोटो आणि व्हिडिओ ची क्वालिटी खराब होत होती. परंतु आता HD कॉलिटीमध्ये स्टेटस ठेवता येईल.

 सध्या बीटा टेस्टर साठी उपलब्ध

कंपनीने HD फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जन साठी लॉन्च केले आहे. यामध्ये आता तुम्ही जेव्हा व्हाट्सअप स्टेटस शेअर कराल तेव्हा तुम्हाला एचडी आयकॉन दिसेल. या HD आयकॉनच्या मदतीने तुम्हाला HD फोटो आणि व्हिडिओ स्टेटस शेअर करण्यास मदत होईल. HD स्टेटस हे नवीन फीचर सध्या बीटा व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर सर्वसामान्य युजर साठी देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.