आता QR कोड लांबूनही होणार स्कॅन; गुगल आणतंय खास फीचर्स

टाइम्स मराठी । QR Scanner बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. आजकाल ऑनलाईन पेमेंटची पद्धत इतकी वाढली आहे कि, साधं चहा पिण्यासाठी खिशात पैसे नसले तरी मोबाईल वरून QR Scanner च्या मदतीने आपण पैसे पाठवतो. यामुळे एटीएम मधून पैसे काढण्याचा वेळही वाचतो आणि खिशात पैसे नसले तरी कोणतं टेन्शन नसत. परंतु QR कोड स्कॅन करण्यासाठी आपल्याला मोबाईल घेऊन त्याच्या जवळ जावं लागत . मात्र, आता असं करण्याची गरज तुम्हाला लागणार नाही. कारण गुगल आता असे एक फीचर्स घेऊन येणार आहे ज्यामुळे QR कोड लांबूनही स्कॅन होऊ शकणार आहे.

   

कॅमेरा फ्रेममधील QR कोड आपोआप शोधण्यासाठी, झूम इन करण्यासाठी आणि तो रीड करण्यासाठी हे वैशिष्ट्य Google चे मशीन लर्निंग वापरते. अजून तरी हे फीचर्स सामान्य यूजर्ससाठी उपयोगात आणलेलं नाही. मात्र काही डेव्हलपर्स साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. अँड्रॉईड तज्ज्ञ मिशाल रहमान यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

गुगलचे हे ऑटो- झूम फीचर्स हे Android 13 किंवा त्याहून नवीन चालणार्‍या डिव्हाइसेसवर चालेल असा अंदाज आहे. याचे कारण त्यांचे QR कोड स्कॅनर तेच ML Kit बारकोड स्कॅनिंग लायब्ररी वापरतो जिथे हे फीचर्स जोडले जात आहे. खराब कॅमेरे असलेल्या लो-एंड अँड्रॉइड फोनवर हे फीचर्स किती वर्क करेल हे सांगता येत नाही परंतु हे एक अतिशय मस्त असे फीचर्स आहे जे लवकरच आपल्याला अनुभवता येऊ शकते. यामुळे QR कोड स्कॅन करणं आणि पेमेंट करणं अतिशय सोप्प होणार आहे.