आता मोबाईलवरच येणार भूकंपबाबत अलर्ट!! गुगल लाँच करणार नवं फीचर्स

टाइम्स मराठी । आपण भूकंप बद्दल (Earthquake) बऱ्याच गोष्टी ऐकत असतो. बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते. यासोबतच नैसर्गिक आपत्तीचे देखील प्रचंड नुकसान होते. अशा भूकंप बद्दल माहिती मिळावी, तसेच मानवी हानी होण्यापासून वाचण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सर्व अँड्रॉइड मोबाईल मध्ये सरकारकडून एक सिस्टीम अलर्ट मेसेज पाठवण्यात आला होता. त्याच प्रकारे आता गुगलकडून (Google) भूकंप अलर्ट सिस्टीम देणारी टेक्नॉलॉजी सर्व अँड्रॉइड मोबाईल मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

   

याबाबत गुगलने माहिती देत सांगितले की, सरकारकडून भूकंप अलर्ट सिस्टीम अँड्रॉइड युजर्स ला प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ही टेक्नॉलॉजी सर्व मोबाईल मध्ये उपलब्ध करण्यात येणार असून या टेक्नॉलॉजीमुळे भूकंप येण्यापूर्वीच मोबाईल मध्ये अलर्ट मिळेल. जेणेकरून बऱ्याच जणांचा जीव वाचू शकतो. भूकंप येणार असल्याचा अलर्ट मिळाल्यामुळे स्थानिक लोक त्या ठिकाणापासून लांब जाऊ शकतील आणि स्वतःचे संरक्षण करू शकतील.

गुगलने नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍथॉरिटी आणि नॅशनल सिस्मोलॉजी सेंटर यांच्यासोबत संवाद साधून या सिस्टीम बद्दल माहिती घेतली. त्यानुसार google भूकंप होणार असेल तेव्हा दोन प्रकारे अलर्ट पाठवणार आहे. पहिला अलर्ट सौम्य धक्क्यांसाठी असेल. पण यावेळी तुमचा मोबाईल नॉट डिस्टर्ब मोड मध्ये असेल, तर तुमचा मोबाईल वाजणार नाही. दुसरा अलर्ट हा भयानक भूकंपासाठी असणार आहे. यावेळी मोबाईल नॉट डिस्टर्ब मोड मध्ये असला तरी देखील हा अलर्ट वाजेल. त्याचबरोबर या अलर्ट सोबतच भूकंप पासून वाचण्यासाठीच्या पद्धती देखील सांगण्यात येईल.