आता Laptop ला बनवा Smart TV; फक्त डाऊनलोड करा ‘हे’ सॉफ्टवेअर

टाइम्स मराठी । आजकाल लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना महामारीपासून वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा लॅपटॉप आहे. आपण लॅपटॉपचा वापर फक्त ऑफिशियल आणि पर्सनल वर्कसाठीच नाही तर आपण आपला लॅपटॉप स्मार्ट टीव्ही मध्ये देखील बदलू शकतो. ते कसं हे आपण आज जाणून घेणार आहोत.

   

तुमच्याकडे कोणताही कंपनीचा लॅपटॉप असेल तर तो तुम्ही स्मार्ट टीव्ही मध्ये देखील स्वीच करू शकतात. त्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर वापरावे लागेल. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही पूर्णपणे फ्री स्मार्ट टीव्हीचा आनंद घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला कोणतेच एक्स्ट्रा पैसे भरावे लागणार नाही. आणि डाऊनलोड करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम देखील येणार नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत Android studio या सॉफ्टवेअर बद्दल. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून Laptop ला Smart TV मध्ये रूपांतरित करू शकता.

Android studio हे सॉफ्टवेअर लॅपटॉपमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील प्रोसेस वापरा.

सर्वात आधी गुगल सर्च इंजिनवर जा.

त्यानंतर Android studio सर्च करा.

सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट लिंक दिसेल. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही Android studio च्या ऑफिशियल साइटवर जाल.

त्यानंतर तुम्हाला Android studio डाउनलोड ऑप्शन दिसेल.

या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचे सॉफ्टवेअर डाऊनलोड होईल.

हे सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही डाऊनलोड सेक्शन मध्ये जाऊन सॉफ्टवेअर वर क्लिक करून Install करू शकतात.

इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या लॅपटॉपच्या होम स्क्रीनवर तुम्हाला सॉफ्टवेअर दिसेल.

त्यानंतर होम स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर वर क्लिक करा. आणि सॉफ्टवेअर लॉन्च करा.

त्यानंतर Android studio च्या होम पेजवर more ऑप्शन दिसेल.

या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Virtual Device ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.

त्यानंतर New Virtual Device क्रिएट करा.

न्यू वर्चुअल डिवाइस क्रिएट केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील.

या ऑप्शन पैकी TV हा पर्याय निवडा.

त्यानंतर तुम्हाला स्क्रीन रिझोल्युशन 1080p सेट करावे लागेल.

यानंतर Next हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुमचा लॅपटॉप स्मार्ट टीव्ही बनू शकतो.