टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेले प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटर चा लोगो बदलला होता. त्यानंतर ट्विटरचे नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. आता ट्विटर उघडल्यास आपल्याला नाव आणि लोगो मध्ये सुद्धा X दिसते. म्हणजेच ट्विटर चा लोगो बदलून एक्स आणि ट्विटर चे नाव देखील एक्स ठेवण्यात आले आहे. त्यानंतर X ने बरेच नवीन फिचर यूजर साठी आणले होते. आता तर मेटा वरून व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल सुद्धा करता येणार आहे.
यामुळे मेटाच्या Facebook, Whatsappआणि Instagram या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मस्क यांचे X जोरदार टक्कर देईल. त्यासाठी ट्विटर एक नवीन फिचर लाँच करेल. त्याप्रमाणेच आता एक्स या प्लॅटफॉर्मवरून देखील व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करता येणार आहे. याबाबत एलन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. मस्क यांनी शेअर केलेल्या या पोस्टला 19.2 m व्ह्यू आले आहेत.
काय म्हणाले एलन मस्क?
यावेळी एलन मस्क यांनी सांगितलं की, या नवीन फिचरचा लाभ सर्व मोबाईल फोन आणि लॅपटॉपला होणार आहे. अँड्रॉइड आयओएस लॅपटॉप मध्ये या फिचरचा वापर सहजपणे करता येईल. त्याचबरोबर खास म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसाठी कोणत्याही मोबाईल नंबरची गरज पडणार नाही. म्हणजे विदाऊट नंबर एक्सच्या माध्यमातून युजर्स एकमेकांना कॉल करू शकतात. या फीचर्सच्या माध्यमातून तुमचा नंबर कोणाकडे जाणार नाही.