आता OTP पासवर्ड न टाकताच Whatsapp लॉगिन होणार; कसे ते पहा

टाइम्स मराठी | जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. Whatsapp वर आता मेटा वेगवेगळे फीचर अपडेट करत असल्यामुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण Whatsapp द्वारे करू शकतो. Whatsapp फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच whatsapp ने आता नवीन फीचर यूजरसाठी आणखीन एक फीचर लॉन्च केले आहे. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही OTP पासवर्ड न टाकताच WhatsApp लॉगिन करू शकता.

   

Whatsapp च्या या नवीन फीचर च्या माध्यमातून युजर्सला बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन सह अकाउंट लॉगिन करण्यासाठी खास ऑप्शन देण्यात आले आहे. या नवीन फीचर च्या माध्यमातून युजर्सला पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. या फिचरच्या माध्यमातून सुरक्षितपणे लॉगीन करता येईल. मेटाने या फिचरला पास-की PassKey असं नाव दिलं आहे. हे फीचर अँड्रॉइड ॲप मध्ये बीटा युजर साठी लॉन्च करण्यात आले आहे.

WaBetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या फिचरला Whatsapp beta for android version 2.23.20.4 चा एक पार्ट बनवण्यात आले आहे. हे फीचर अजून तरी संपूर्ण युजर साठी उपलब्ध नसून काही युजर ला हे फीचर टेस्टिंग साठी उपलब्ध करण्यात आले आहे. या फीचर्स पब्लिकेशनने नवीन स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या PassKey फीचर च्या माध्यमातून सुरक्षितरित्या साइन इन करणे सोपे होईल. हे फीचर सहजतेने आणि सुरक्षित ऑथेंटीकेशनच्या माध्यमातून बाकीच्या डिवाइस मध्ये Whatsapp लॉगिन करण्यावेळी वापरता येऊ शकते.

PassKey या फीचर च्या माध्यमातून तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तरी देखील तुम्ही साइन इन करू शकाल. या PassKey च्या माध्यमातून तुम्ही ठेवलेला पासवर्ड हा पासवर्ड मॅनेजर मध्ये सेव्ह केला जातो. जेणेकरून पासवर्ड हरवल्यानंतर आपल्याला या फीचर च्या माध्यमातून पासवर्ड लगेच मिळेल. हे फीचर सध्या अँड्रॉइड युजरसाठी उपलब्ध असून ios साठी देखील लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. याबाबत आणखीन माहिती मिळाली नसून लवकरच हे फीचर सर्वांसाठी खुले करण्यात येईल.