आता Whatsapp वरूनही खरेदीही करता येणार; लवकरच लाँच होणार नवं फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp जगातील करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. असच एक फीचर्स लाँच करण्याची तयारी कंपनी करत आहे, त्यानंतर तुम्ही whatsapp च्या माध्यमातून फक्त चॅटिंग नाही तर खरेदी पण करू शकतात. Whatsapp ने आता युज ला UPI अँप, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग चा वापर करून whatsapp च्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा युजर्सला उपलब्ध करून दिली आहे.

   

मेटाच्या मालकीचे मेसेजिंग ॲप म्हणून ओळख असलेल्या Whatsapp ने युजरला जास्त पेमेंट ऑप्शन मिळावे यासाठी Razorpay आणि PayU यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. जेणेकरून युजर्सला प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करता येईल. या फीचरच्या माध्यमातून Whatsapp वर चॅटिंग करत असताना सहजतेने खरेदी करता येईल.

Whatsapp च्या या नवीन फीचर च्या माध्यमातून युजर्स ऍड टू कार्ड मध्ये आवडलेले प्रॉडक्ट ऍड करू शकतात. त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात. हे नवीन फीचर Whatsapp वर व्यवसाय करत असलेल्या यूजरसाठी आणि खरेदीदारांसाठी अतिशय उपयुक्त असेल. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची ही योजना आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून बिजनेस किंवा प्रॉडक्ट विक्री वाढावी यासाठी हे फीचर लाँच करण्यात आले आहे.

याबद्दल कंपनीने सांगितले की, भारतामधील लोक Whatsapp च्या या फीचरच्या माध्यमातून कार्ट मध्ये आवडलेले आईटम जोडू शकतात. आणि भारतामध्ये सुरू असलेल्या यूपीआय, डेबिट आणि क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करू शकतात. पेमेंट करणे सहज सोपे व्हावे यासाठी कंपनीने Razorpay आणि PayU यांच्यासोबत पार्टनरशिप केल्याचे कंपनीने सांगितलं.