आता Whatsapp चॅट बॅकअप घेण्यासाठी भरावे लागतील पैसे

टाइम्स मराठी । Whatsapp मधील डेटा मोबाईल मध्ये सेव्ह राहावा यासाठी आपण गुगल क्लाऊड चा वापर करतो. जेणेकरून गुगल क्लाऊडच्या माध्यमातून आपला डेटा मोबाईल मध्ये सेव्ह राहील.  या सोबतच दुसऱ्या मोबाईल मध्ये तुमचे Whatsapp सुरू करत असताना  जुन्या मोबाईलवर असलेला whatsapp चा डेटा घेण्यासाठी आपण चॅट बॅकअप ऑप्शन निवडतो. या चॅट बॅकअप च्या माध्यमातून आपल्या व्हाट्सअप मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व जुन्या चॅट आपण रिकव्हर करू शकतो. परंतु आता क्लाऊड वर चॅट बॅकअप डेटा घेण्यासाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार आहे.

   

गुगल ब्लॉग वरून मिळाली माहिती

गुगलने सोमवारी एक ब्लॉग पोस्ट करत याबाबत घोषणा केली. आता अँड्रॉइड फोनवर व्हाट्सअप हिस्ट्री बॅकअप घेण्यासाठी गुगलच्या क्लाऊड स्टोरेज  साठी एक मर्यादा लावण्यात येणार आहे. आतापर्यंत  युजर्स ला क्लाऊड वर चॅट बॅकअप घेणे अतिशय सोपे होते. परंतु आता करण्यात आलेल्या या बदलामुळे बऱ्याच अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. आता युजर्स ने 15 GB पेक्षा जास्त बॅकअप घेतल्यावर अँड्रॉइड युजरला फाईलचा आकार कमी करावा लागेल. किंवा वेगळे स्टोरेज खरेदी करावे लागेल. त्यासाठी युजरला बरेच पैसे मोजावे लागू शकतात.

2018 मध्ये करण्यात आले होते एग्रीमेंट

2018 मध्ये व्हाट्सअप ने गुगल सोबत एग्रीमेंट साइन केले होते. त्यानुसार गुगल ड्राईव्ह स्टोरेज पेक्षा whatsapp बॅकअप साठी अनलिमिटेड स्टोरेज देण्यात आले होते. 2018 मध्ये केलेले हे एग्रीमेंट आता संपले असून आता चॅट बॅकअप लिमिटेड क्लाऊड स्टोरेज चा हिस्सा असेल. आता ही नवीन पॉलिसी डिसेंबर 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. iOS डिवाइस वापरणाऱ्या यूजरला चॅट बॅकअप घेण्यासाठी 5 GB विनामूल्य स्टोरेज मिळते. यापेक्षा जास्त स्टोरेज साठी त्यांना पैसे भरावे लागतात.

घ्यावा लागेल पेड सबस्क्रीप्शन प्लॅन

नवीन पॉलिसीनुसार पुढच्या महिन्यापासून चॅट बॅकअप साठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार आता गुगल ड्राईव्ह मध्ये व्हाट्सअप चॅट बॅकअप फ्री मध्ये स्टोअर करता येणार नाही. अँड्रॉइड युजर्स ला आता व्हाट्सअप चॅट बॅकअप साठी फक्त 15 GB स्टोरेज मिळेल. यापेक्षा जास्त स्टोरेज हवे असल्यास पैसे मोजावे लागतील. या 15 GB स्टोरेज मध्ये जीमेल, गुगल ड्राईव्ह डेटा सेव्ह करण्यात येईल. हे 15 GB स्टोरेज  फुल झाल्यानंतर तुम्हाला चॅट बॅकअप साठी Google One चा पेड सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला वर्षाला 1300 रुपये भरावे लागेल.

फ्री मध्ये व्हाट्सअप चॅट बॅकअप घेण्यासाठी वापरा ही ट्रिक

जर तुम्ही फ्री मध्ये व्हाट्सअप चॅट बॅकअप घेऊ इच्छित असाल तर  तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये छोट्या छोट्या फाईल अपलोड कराव्या लागतील. यासोबतच तुम्ही सेव्ह केलेले फोटोज, व्हिडिओ डिलीट करावे लागतील. जेणेकरून गुगल ड्राईव्ह मधील स्टोरेज खाली होईल आणि चॅट बँकअप घेण्यासाठी तुमच्यासमोर पर्याय उभा राहील.