महाराष्ट्रात Electric वाहनांची संख्या वाढली; विजेच्या वापरात तिप्पट वाढ

टाइम्स मराठी | आज-काल इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव पाहता सर्वजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी आपली पसंती दाखवत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मदत मिळते. इलेक्ट्रिक वाहनांना लागणारी चार्जिंग ही विजेवर होत असते. ही वीज विक्री महावितरण कडून करण्यात येते. त्यानुसार आलेला रिपोर्टनुसार मागच्या वर्षी सप्टेंबर ते जुलै या महिन्यांमध्ये ही वीज विक्री तीन पट वाढली आहे.

   

विजेच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड MSEDCL यांच्यानुसार, मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये विजेचा वापर 4.56 दशलक्ष युनिट वरून 2023 मध्ये जुलै महिन्यापर्यंत 14.44 लक्ष युनिट एवढा वाढून तिप्पट झाला आहे. याबाबत MSEDCL कडून सोमवारी ही माहिती देण्यात आली. महावितरणाची आणि खासगी एकूण 3214 चार्जिंग स्टेशन्स आहेत. यानुसार इलेक्ट्रिक वाहनांसाठी करण्यात आलेली विजेची विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च 2023 मध्ये ही विक्री 6.10 लक्ष युनिट एवढी होती. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये 14.44 दशलक्ष युनिट एवढी विजेची विक्री करण्यात आली असल्याचं महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांनी दिली.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या देखील वाढली

महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 2018 मध्ये 4643 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. ती 2022 मध्ये वाढून 1,89,693 युनिट एवढी झाली. त्यानंतर 31 मार्च पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री संख्या 2,98,838 एवढी झाली. या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री संख्येपैकी टू व्हीलर वाहनांची संख्या ही अडीच लाख एवढी आहे.

2018 मध्ये होत्या चार बस आता आकडा 1399

इलेक्ट्रिक बसेसची संख्या सुद्धा राज्यामध्ये प्रचंड वाढली आहे. 2018 मध्ये फक्त चार इलेक्ट्रिक बस विकल्याची नोंद करण्यात आली होती. 2022 ला ही संख्या 336 एवढी झाली. आणि मार्च 2023 मध्ये इलेक्ट्रिक बसेसची संख्या 1399 एवढी वाढली. याबाबतचे सर्व माहिती महावितरणाच्या पत्रकात देण्यात आली आहे. या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ऊर्जा खाते आहे त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला असं यामध्ये म्हटलं आहे.

एवढा आहे पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च

पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या टू व्हीलर ऑपरेटिंग खर्च 2.12 रुपये प्रति किलोमीटर एवढा येतो. तर इलेक्ट्रिक टू व्हीलर ला 54 पैसे प्रति किलोमीटर एवढा खर्च येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रिक फोर व्हीलर वाहनांसाठी 1.51 प्रति किलोमीटर खर्च येतो. हाच खर्च पेट्रोल डिझेल वाल्या कार साठी 7.57 प्रति किलोमीटर एवढा आहे. असं महावितरणाच्या पत्रामध्ये सांगण्यात आलं.