‘या’ तारखेला जन्मलेली मुले असतात नशीबवान; प्रत्येक क्षेत्रात मिळतं यश

टाइम्स मराठी । मूल जन्मल्यानंतर ज्योतिष शास्त्रानुसार त्याची रास आणि नावाचे अक्षर ठरवले जाते. त्याचप्रकारे जन्मतारखेनुसार अंकशास्त्रांमध्ये व्यक्तींचा स्वभाव जाणून घेता येतो. जन्मतारखेच्या मूल्यांकाच्या (Numerology)आधारावर एखाद्या व्यक्तीचे वागणे, त्याच्या आयुष्यातील चढ-उतार आणि भविष्य निश्चित केलं जाते. त्याचबरोबर जन्मतारखेनुसार व्यक्तीचा मूल्यांक कोणता आहे हे ठरवलं जाते. त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारावरून स्वभाव ओळखणे देखील सोपे आहे. यामधून फक्त स्वभावच नाही तर बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो.

   

जर महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्माला आलेल्या लोकांचा मूल्यांक हा 1 असतो. याच मुलांकाच्या आधारावर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्वात गोष्टींची माहिती घेता येते. त्यानुसार त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व वागणूक भविष्य कसे असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. 1, 10, 19, 28 या तारखेला जन्मलेली 1 या मुलांकाची मुलं हे स्वाभिमानी, दृढ निश्चयी असतात. त्यानंतर ते प्रामाणिक होतात आणि त्यांच्या नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सर्व काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात. या सोबतच ते ध्येयवान देखील असतात. येणाऱ्या कोणत्याही समस्येला ते घाबरून न जाता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवतात.

या मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव हा साहसी असल्यामुळे चांगल्या पद्धतीने घर सांभाळू शकतात. संपत्तीच्या बाबतीमध्ये ते समृद्ध असून त्यांना पैशांची कमतरता कधीच भासत नाही. यासोबतच ते त्यांना आवश्यक असलेल्या आणि हौस मौजेच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. या मूल्यांकाचे व्यक्ती उच्च शिक्षण घेऊन त्यांना संशोधनामध्ये जास्त रस असतो. यासोबतच त्यांचा स्वभाव हा उत्साही असल्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये ते हमखास यशस्वी होतात. सोबतच पुढे जाऊन व्यवस्थापक आयएएस, पीसीएस अधिकारी देखील ते बनतात. त्यांच्याकडे असलेली चांगली नेतृत्व क्षमता हे त्यांना राजकारणाच्या क्षेत्रात देखील चांगली कामगिरी करण्यास भाग पाडते. एवढेच नाही तर डॉक्टर इंजिनिअर सर्जन आणि दंतचिकित्सक म्हणून देखील ते उच्च कामगिरी करू शकतात.