दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जुळून येतोय शश नावाचा राजयोग; ‘या’ लोकांना होणार फायदा

टाइम्स मराठी । आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 30 वर्षानंतर शश नावाचा शाही योग जुळून येत आहे. यामुळे यंदाचा दसरा काही राशींसाठी अत्यंत लाभदायी ठरणार असून काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य देखील उजळणार आहे.  दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. आणि माता दुर्गेने महिषासुराचाही वध केला होता. तेव्हापासून दसरा हा सण साजरा केला जातो. दसरा हा सण संपूर्ण देशभरामध्ये चांगल्या वर वाईट असा विजय म्हणून साजरा केला जातो. यंदा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शनि हा मूळ त्रिकोण राशीत म्हणजे कुंभ राशी मध्ये असल्यामुळे शश नावाचा राजयोग तयार होत आहे. या राज योगामुळे काही राशींना भरपूर फायदा होणार आहे.

   

१) सिंह

सिंह राशींच्या व्यक्तींवर दसऱ्याच्या निमित्ताने तयार होत असलेल्या शश नावाच्या राज योगामुळे चांगला प्रभाव दिसून येईल. या काळात सिंह राशींच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व सुधारेल. त्याचबरोबर घरात अचानक पाहुण्यांचे आगमन होण्याची देखील शक्यता आहे. सिंह राशींच्या व्यावसायिक वर्गाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळामध्ये तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने आत्मविश्वास देखील वाढेल. दसऱ्याच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाच्या कृपेने तुमचे जीवन आनंददायी होईल.

२) कन्या

कन्या राशीतील व्यक्तींना आज लक्षणीय यश मिळू शकते. कन्या राशीतील व्यक्तींना शैक्षणिक कार्यामध्ये रस निर्माण होईल. या राशीतील व्यक्तींचा मान सन्मान वाढेल. घरातील कामे पूर्ण करण्यामध्ये यश मिळेल. दसऱ्याच्या शुभ निमित्ताने आणि प्रभू रामाच्या आशीर्वादाने बऱ्याच योजना वेळेवर पूर्ण होतील. कन्या राशीतील व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आनंदाचे वातावरण राहील. भविष्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन पावले उचलण्यासाठी चांगला दिवस आहे.

३) धनु

धनु राशींच्या व्यक्तींसाठी हा आर्थिक लाभाचा काळ आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिक सहलीला देखील लाभ मिळेल. या राशींतील व्यक्ती ऑफिसातील काम पूर्ण करण्यामध्ये पूर्णपणे सक्षम राहतील. धनु राशीतील व्यक्तींचा दिवस आणि विद्यार्थ्यांसाठीचा आजचा दिवस खुप चांगला राहील. करिअरमध्ये नवीन संधी प्रस्थापित होतील.

४) मकर

मकर राशींच्या व्यक्तींसाठी आज एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. त्यानुसार घरामध्ये एखादी नवीन वस्तू येईल. मकर राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात पुढे जाण्याचे नवीन मार्ग खुले होतील. आज वाहन मिळण्याची शक्यता. मकर राशींच्या व्यक्तींचा आज नवीन काम सुरू करण्याचा विचार असेल. व्यवसाय संबंधित लोकांचा देखील आजचा दिवस चांगला जाईल.

५) कुंभ

कुंभ राशींच्या व्यक्तींना जीवनसाथी कडून पूर्णपणे सहकार्य मिळेल. आज उत्पन्नाचे बरेच स्त्रोत समोर येतील. कुंभ राशींच्या व्यक्तींचे कार्यालयीन कामकाज दैनंदिन रुटीन पेक्षा चांगले जाईल. कुंभ राशींच्या संपत्तीमध्ये आज वाढ होऊ शकते.