Odysse E2GO Graphene : 100 KM रेंज देणारी नवीन Electric Scooter लाँच; किंमतही तुम्हाला परवडणारी

टाइम्स मराठी । पेट्रोल- डिझेलच्या किमतींमुळे भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचे (Electric Scooter) डिमांड चांगलंच वाढलं आहे. आकर्षक लूक आणि इंधनाची कटकट नसल्याने ग्राहकांना सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांचे मोठं आकर्षण राहिले आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता मागील वर्षभरात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दुचाकी उत्पादक कंपनी Odysse ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Odysse E2GO Graphene लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची रेंज तब्बल 100 KM असून तिची किंमतही सर्वसामान्याना परवडेल अशी आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

   

फीचर्स

Odysse Electric ही मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीने लाँच केलेल्या Odysse E2GO Graphene ही इलेक्ट्रिक स्कुटर 8 तासात फुल चार्ज होते. आणि एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर अंतर पार करते. गाडीचे टॉप स्पीड २५ KM प्रतितास इतकं आहे. ही इलेक्ट्रिक तुम्ही कोणत्याही लायसन्स आणि रजिस्ट्रेशन शिवाय कुठेही चालवू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये टेलिस्कोपिक फोर्क, मोनोशॉक सस्पेन्शन, एलईडी हेडलॅम्प, डिजिटल कन्सोल, थ्री इन वन लॉक सिस्टीम, विदाऊट की स्टार्ट, रिव्हर्स मोड, मोबाईल चार्जिंग सॉकेट यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.तसेच सेफ्टी साठी फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध करण्यात आला आहे.

किंमत किती? Odysse E2GO Graphene

कंपनीने Odysse E2GO Graphene ची किंमत 63,550 रुपये एवढी ठेवली असून ही इलेक्ट्रिक स्कूटरऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कुटर मॅट ब्लॅक, कॉम्बेट रेड, स्कार्लेट रेड, टील ग्रीन, एज्योर ब्ल्यू आणि कॉम्बेट ब्ल्यू अशा ६ रंगात खरेदी करू शकता.