Odyssey कंपनीने लाँच केलं e2Go चे ग्राफीन व्हेरिएंट, जाणून घ्या फीचर्स 

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांची चलती प्रचंड वाढली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे इलेक्ट्रिक स्कूटर हा पर्याय असल्याचे दिसून येते. यामुळेच इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे देखील सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड कल दिसून येतो. अशातच आता Odyssey या इलेक्ट्रिक व्हेईकल निर्माता कंपनीने मार्केटमध्ये आणखीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. यापूर्वी मार्केटमध्ये उपलब्ध असलेली  Odyssey e2Go या इलेक्ट्रिक स्कूटरचे ग्राफिन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे. ही मेड इन इंडिया प्रोडक्ट असल्याचे कंपनीने सांगितले. जाणून घेऊया या स्कूटरचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

Odyssey या इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीने लॉन्च केलेले  e2Go चे ग्राफीन व्हेरिएंट प्रत्येक व्यक्तींच्या बजेटमध्ये फिक्स होणारी आहे. e2GO ग्राफीन ही इलेक्ट्रिक स्कूटर सर्व प्रकारच्या लोकांसाठी डिझाइन केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या संपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर डेव्हलप केली आहे. युजर्स ही स्कूटर विदाऊट लायसन आणि रजिस्ट्रेशन चालवू शकतात. जेणेकरून  इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना कोणतीही अडचण येणार नाही.

किंमत किती

e2GO ग्राफीन ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने प्रत्येक युजरच्या पर्सनालिटीला जुळण्यासाठी आकर्षक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार या स्कूटरमध्ये मॅट ब्लॅक, कॉम्बॅट रेड, स्कार्लेट रेड, टील ग्रीन, अझूर ब्लू आणि कॉम्बॅट ब्लू हे कलर मिळतात. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 63,650 रुपये ठेवली आहे. Odyssey इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी प्रत्येक वाहनांवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे.

फिचर्स

e2GO ग्राफीन या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नव्याने डेव्हलप केलेली आणि नुकतीच लॉन्च करण्यात आलेली ग्राफीन बॅटरी वापरण्यात आली आहे. जेणेकरून  युजर्स ला आरामदायक रायडिंग चा अनुभव मिळेल.  ही बॅटरी 8 तासात पूर्णपणे चार्ज होते. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 100 किलोमीटर पर्यंत प्रभावी रेंज देते. e2GO ग्राफीनमध्ये USB चार्जिंग, अँटी थेफ्ट लॉक, कीलेस एंट्री, डिजिटल स्पीडोमीटर यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. हे फिचर्स रायडिंग करताना अप्रतिम अनुभव प्रदान करतात.

काय म्हणाले Odyssey व्हिकलचे CEO

Odyssey इलेक्ट्रिक व्हीकल प्रायव्हेट लिमिटेडचे CEO नेमिन वोरा म्हणाले की,“ ग्राफीन बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर e2Go ग्राहकांना नाविन्यता आणि स्वस्त दरात उत्कृष्ट दर्जाची ई- स्कूटर उपलब्ध करणे  यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.  भारतीय रायडर्सला एक टिकाऊ आणि गतिशील पद्धत प्रदान करण्यात आम्ही विश्वास ठेवतो. यामध्ये आम्ही देखावा करत नाही आणि  इलेक्ट्रिक स्कूटर या किफायती किमतीत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो.