‘या’ Electric Scooter वर 14 नोव्हेंबरपर्यंत बंपर डिस्काउंट; उशीर करू नका

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा Electric Scooter ची जास्त चलती आहे. बऱ्याच कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यामध्ये त्यांच नशीब आजमावत असून ग्राहकांसाठी या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा देखील कंपन्यांचा प्रयत्न आहे. आकर्षक आणि जास्त रेंज तयार करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. तसेच ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफरही देत असतात. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू व्हीलर वाहन निर्माता कंपनी ओकाया Okaya EV ने 14 नोव्हेंबर पर्यंत आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर वर बम्पर ऑफर दिली आहे. कंपनीकडून 14 नोव्हेंबर पर्यंत या गाडीवर 4999 ची ॲक्सेसरीज आणि रोड साईड असिस्टंट ऑफर देण्यात येत आहे

   

किंमत किती ?

Okaya EV च्या क्लासिक वेरिएंट ची किंमत 74,499 एवढी असून फ्रीडम या व्हेरिएंटची किंमत 74,899 आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर ला चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन ची गरज पडत नाही. कारण या दोन्ही स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. Okaya EV कंपनीने फास्ट सिरीज मध्ये हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर देखील ऑफर दिले आहेत. यामध्ये F2F, F2T, F2B या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहे. F2F या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 93 हजार 999 आहे. F2T या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 99400 आहे. आणि F2B ची किंमत 9950 आहे. या तिन्ही व्हेरियंटवर सरकारकडून फेम 2 सबसिडी देण्यात येत आहे.

कंपनीने या फायनान्शिअल ऑर्गनायझेशनसह केली पार्टनरशिप

ओकाया ब्रँड ने नुकताच ग्राहकांसाठी आकर्षक फायनान्शिअल स्किम लॉन्च केली आहे. या स्क्रीम साठी कंपनीने 12 फायनान्शिअल ऑर्गनायझेशन सह पार्टनरशिप केली आहे. यामध्ये एचडीएफसी, ॲक्सिस, आयडीएफसी, लोन टॅप, बाईक बाजार यासारख्या बऱ्याच फायनान्शियल ऑर्गनायझेशन सहभागी आहे. कंपनीने फायनान्शिअल प्रोसेस सोप्पी करण्यासाठी ही पार्टनरशिप केली आहे.

जाणून घ्या ऑफर

Okaya EV कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडे दोन ऑप्शन उपलब्ध आहे. त्यापैकी हाय स्पीड आणि लो स्पीड मधील कोणतेही वाहून तुम्ही खरेदी करू शकतात. या दोन्ही वाहनांसाठी ग्राहकांना झिरो डाउन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फीस, 48 महिन्यांपर्यंत लोन स्कीम या ऑफर देण्यात येत आहे. एवढेच नाही तर या कर्जासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. फक्त तीस मिनिटांमध्ये कर्जबाबतची संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईल.