स्वस्तात खरेदी करा Okaya Freedum इलेक्ट्रिक स्कुटर; 120 KM रेंज

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक स्कूटरकडे ग्राहकांचे आकर्षण वाढलं आहे. इलेक्ट्रिक स्कुटर मुळे प्रदूषणाला सुद्धा आळा बसत असल्याने मार्केट मध्ये मागणीही वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या अपडेटेड व्हर्जन मध्ये आणि वेगवगेळ्या फीचर्सनुसार लाँच करत आहेत. ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा देखील कंपन्यांचा प्रयत्न असून चांगली रेंज आणि उत्कृष्ट फीचर्ससह गेल्या वर्षभरात अनेक इलेक्ट्रिक गाड्या लाँच झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता Okaya Freedum ही स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कुटर आता लाँच करण्यात आली आहे. आज आपण या गाडीचे फीचर्स, तिचे मायलेज आणि किंमत याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

   

120 किलोमीटर पर्यंत रेंज-

Okaya Freedum या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 48 V 30 Ah बॅटरी देण्यात आली असून ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्ज मध्ये 120 किलोमीटर पर्यंत रेंज देते. खास बाब म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये सर्वात उत्तम वॉरंटी देण्यात येत आहे. त्यानुसार कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कूटर वर तीन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आढळल्यास आता टेन्शन घ्यायचे काम नाही.

Okaya Freedum या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये असलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ऑडोमीटर, यूएसबी पोर्ट, स्टार्ट बटन, नेविगेशन, जीपीएस, मोबाईल कनेक्टिव्हिटी यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध आहेत.

किंमत किती?

Okaya Freedum ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 72,450 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकतात. इतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत Okaya Freedom ची किंमत कमी असल्याने ग्राहकांकडून या स्कुटरची मागणी वाढण्याची शक्यता आहे.