टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता महागाई सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे आज काल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे जवळपास सर्वच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लक आजमावत आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये एकापेक्षा एक वरचढ इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध आहेत. त्यातच आता इलेक्ट्रिक वाहन बनवणारी Okaya कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर च नाव Okaya Motofaast असं आहे. या फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.
बॅटरी–
Okaya Motofaast या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.53 kwh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी जवळपास पाच तास लागतात, परंतु एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 130 किलोमीटर अंतर पार करते. या स्कुटरचे टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. तसेच यामध्ये कंपनीने इको, सिटी आणि स्पोर्ट्स हे ३ ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत.
फीचर– Okaya Motofaast
Okaya Motofaast या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सात इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यासोबतच सस्पेन्शनसाठी कंपनीने स्कूटरमध्ये फ्रंटला कन्वेंशनल टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रियर मध्ये स्प्रिंग लोडेड हायड्रोलिक शॉक अब्जोर्बर उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटर च्या दोन्ही टायरमध्ये कॉम्बी डिस्क ब्रेक सिस्टीम वापरण्यात आली आहे. तसेच डायमंड कट अलॉय आणि 12 इंच ट्यूबलेस टायर देखील यामध्ये उपलब्ध आहे.
किंमत किती–
Okaya Motofaast या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 1,36,999 रुपये एवढी आहे. ही स्कूटर पुढच्या महिन्यामध्ये डिलिव्हरी साठी ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या या स्कूटरची प्री बुकिंग सुरू असून तुम्ही 2500 रुपयांमध्ये स्कूटर प्री बुक करू शकता. ओकाया कंपनीने या रंगांचा समावेश आहे.