Ola Electric ची 72 तासांसाठी दसरा फेस्टिवल ऑफर; बंपर डिस्काउंटसह खरेदी करा स्कूटर

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Ola कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ही Top 5 पैकी एक आहे. Ola Electric ही भारतात अत्यंत प्रसिद्ध स्कूटर आहे. सध्या फेस्टिवल सिझन चे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. त्यातच बऱ्याच कंपन्या त्यांच्या वस्तूंवर बंपर डिस्काउंट ऑफर करत असून आता त्याच पार्श्वभूमीवर Ola Electric ने देखील फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर सुरू केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना बंपर डिस्काउंटचा फायदा होऊ शकतो.

   

Ola Electric ने उपलब्ध केलेल्या फेस्टिवल डिस्काउंट ऑफरमध्ये झिरो डाउन पेमेंट, नो कॉस्ट EMI , झिरो प्रोसेसिंग फीस, 6 टक्के कमी व्याजदर यासारखे फायनान्स ऑप्शन देखील उपलब्ध केले आहे. त्यानुसार Ola Electric ने ग्राहकांसाठी 72 तासांसाठी इलेक्ट्रिक रश नावाने सीजन डिस्काउंट उपलब्ध केला आहे. ही ऑफर 22 तारखेपासून ते 24 ऑक्टोबर पर्यंत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उपलब्ध केली आहे. जाणून घेऊया या ऑफर बद्दल ….

ऑफर

Ola Electric या कंपनीने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उपलब्ध केलेल्या या ऑफरनुसार ग्राहकांना 24500 रुपयांचा फायदा होणार आहे. एवढेच नाही तर 22 तारखेपासून 24 पर्यंत 72 तासांमध्ये आणखीन 2000 रुपयांचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. ओला कंपनीने डिस्काउंट ऑफर सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात येणाऱ्या बॅटरीवर पाच वर्षांची वॉरंटी देखील उपलब्ध केली आहे.

एक्सचेंज ऑफर

भारतीय बाजारपेठेमध्ये Ola इलेक्ट्रिक कंपनीच्या वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. यामध्ये Ola s1 pro, Ola S1 air, new Ola S1 X+ या  इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश होतो. कंपनीने ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या ऑफरमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर वर दहा हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील देण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये टू व्हीलर एक्सचेंज करता येऊ शकतात.

Ola S1 X+ जिंकण्याची संधी

ओला कंपनीने या दसरा स्पेशल फेस्टिवल डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून लकी ड्रॉ ऑप्शन देखील ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. त्यानुसार दररोज एक Ola S1 X+ ही इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळू शकतो. यासोबतच कंपनीने Ola केअर प्लस सर्विस देखील ऑफर मध्ये उपलब्ध केली आहे.

कॅशबॅक ऑफर

जर तुम्ही Ola कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर एखाद्या व्यक्तीच्या रेफरन्सने खरेदी करणार असाल तर तुम्हाला दोन हजार रुपयांपर्यंत एक्स्ट्रा सूट मिळू शकते. एवढेच नाही तर तुम्ही वाहन खरेदी केल्यानंतर रेफर करणाऱ्या व्यक्तीला देखील हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. OLA कंपनीने उपलब्ध केलेल्या या डिस्काउंट ऑफर च्या माध्यमातून नुकतीच लॉन्च झालेली इलेक्ट्रिक स्कूटर देखील तुम्ही खरेदी करू शकतात. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर वर देखील कंपनीने ऑफर उपलब्ध केले आहेत. त्यानुसार फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून तुम्ही कमी किमतीमध्ये ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता.