टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता पाहता देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनी ओलाने आपल्या २ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ही स्कूटर म्हणजे Ola S1X आणि सेकंड जनरेशन वाली Ola S1 pro. ओला कंपनीने S1 pro मध्ये दोन नवीन कलर व्हेरिएंट ऍड केलेले असून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन्ही व्हेरियंट ची डिलिव्हरी सुरू होणार आहे. आज आपण या दोन्ही स्कुटरची खास वैशिष्टये, किंमत, रेंज याबाबत जाणून घेऊयात …
1) Ola S1X
Ola S1X या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 151 km एवढी असेल. यामध्ये 2 kwh आणि 3 kwh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये हब मोटर उपलब्ध असून ही मोटर 6kw मॅक्झिमम पॉवर आउटपुट देते. Ola S1X चे टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रती तास इतकं असून अवघ्या 3.3 सेकंदात ही गाडी 0 ते 40 किलोमीटर प्रतितास स्पीड पकडते. कंपनीने Ola S1X दोन वेरीयंट मध्ये लाँच केली आहे. यातील S1X च्या 2KWH स्कूटर ची किंमत 89,900 असून S1X स्कुटरच्या 3KWH ची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1X + ची किंमत 1,09,999 एवढी आहे. तुम्ही जर 21 ऑगस्ट पर्यंत या ही स्कुटर खरेदी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये पर्यंत सूट मिळू शकते.
2) Ola S1 Pro
Ola च्या या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 11 KW मोटर देण्यात आलेली असून ही स्कूटर तब्बल 195 किलोमीटर पर्यंत रेंज देण्यासाठी सक्षम आहे. ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड सुद्धा १२० किलोमीटर प्रतितास असं मजबूत आहे. तसेच अवघ्या 2.6 सेकंदात Ola S1 pro 40 किलोमीटर प्रतितास वेग पकडते. जर तुम्ही होम चार्जर वापरून ही स्कूटर चार्ज करणार असाल तर ही 6.5 तासांमध्ये 100% चार्ज होईल. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 195 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंटिग्रेटेड मोटर कंट्रोल युनिट सह सिम्पलीफाइड इलेक्ट्रिक मोटर देखील वापरण्यात आली आहे. कंपनीच्या या सेकंड जनरेशन वेरियंट ची किंमत 1,47,499 रुपये एवढी आहे. ओला कंपनीच्या S1 pro ही स्कूटर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डिलिव्हरी करण्यात येणार आहे.