Ola Roadster : Ola लवकरच लाँच करणार Electric Bike; KTM ला देणार टक्कर

Ola Roadster । आज-काल इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. सर्वच कंपन्या एकापेक्षा एक आकर्षक इलेक्टरक गाड्या बाजारात आणत असल्याने मार्केट मध्ये स्पर्धाही वाढली आहे. आकर्षक लूक आणि पेट्रोल डिझेलची झंझट नसल्याने ग्राहक सुद्धा नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत असतात. सध्या . इलेक्ट्रिक सेगमेंट मधील टॉप ची कंपनी म्हणून Ola कडे बघितलं जात. ओला च्या गाड्यांचा खपही जास्त आहे. त्यातच आता ग्राहकांना आणखी चांगली सुविधा देण्यासाठी ओला लवकरच इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. Ola Roadster असे या गाडीचे नाव असून ही बाईक ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते.

   

220 किलोमीटर पर्यंत रेंज – Ola Roadster

ही इलेक्ट्रिक बाइक डॅशिंग्टलाईटसह कम्फर्टेबल सीट मध्ये उपलब्ध होईल. ही एक स्टायलिश बाईक असणार आहे. यासोबतच ओला कंपनी आणखीन पाच इलेक्ट्रिक बाइक्स लवकरच लॉन्च करणार असून या पाच बाईक न्यू जनरेशन बाईक असतील. Ola Roadster ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जवर 220 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल. तसेच गाडीचे टॉप स्पीड 130 किलोमीटर प्रतितास असेल. या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवाती किंमत 1.50 लाख रुपये असणार आहे. यासोबतच टॉप मॉडेल २ लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध होईल.

अन्य फीचर्स –

Ola Roadster या अपकमिंग बाईकमध्ये सेफ्टी साठी फ्रंट आणि रियल दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक देण्यात येईल. त्याचबरोबर डिजिटल स्पीडोमीटर देखील कंपनीकडून देण्यात येईल. ही अपकमिंग बाईक LED लाईट सह ऑटो डायमिंग मिररमध्ये उपलब्ध होऊ शकते. कंपनीकडून यामध्ये मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात येणार आहे. यासह इन्व्हर्टेड फ्रंट फ्रोक सस्पेन्शन देखील यामध्ये मिळेल. जेणेकरून खराब रस्त्यांवर रायडर ला राईड करताना प्रॉब्लेम येणार नाही. यासोबतच मिनिट माउंटेन मोटर देखील यामध्ये देण्यात येईल. Ola Roadster ही अपकमिंग इलेक्ट्रिक बाइक KTM 125 Duke, Yezdi Roadster, HOP Elect ric OXO आणि Pure EV Etryst 350 या गाडयांना जोरदार टक्कर देईल.