Ola च्या स्वस्तात मस्त Electric Scooter ची डिलिव्हरी सुरु; 101 KM रेंज, किंमत किती?

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. परवडणाऱ्या किंमतीत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून डिझाईन आणि लूक यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Ola ने आपली सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर ओला S1 एयरची डिलिव्हरी सुरु आहे .

   

काय आहेत फीचर्स –

ओला S1 एयर या इलेक्ट्रिक स्कूटर चे वजन 99 kg एवढे असून LED हेडलॅम्प आणि टेललॅम्प, फ्लॅट फ्लोअरबोर्ड देण्यात आले आहे. या स्कूटर ला S1 आणि S1 प्रो पेक्षा वेगळे सीट देण्यात आले असून सिंगल पीस ट्यूबलर ग्रॅब हँडल, TFT डिस्प्ले 7 इंच, यासह हिल होल्ड आणि प्रॉक्सीमिटी अलर्ट यासारखे फीचर्स या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आले आहे. ओला S1 एयर मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क, ट्विन रियर शॉक अब्जॉर्बर यासह फ्रंट और रियर ड्रम ब्रेक्स देखील देण्यात आले आहे.

101 KM रेंज-

ओला S1 एयर च्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 3kwh बॅटरी पॅक देण्यात आलाय . यासोबत हब माउंटेन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आली असून ती 4.5kw पॉवर जनरेट करते. ही स्कूटर एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 101 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल. तसेच या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रतितास इतकं आहे. ओला S1 एअर मध्ये इको, नॉर्मल, स्पोर्ट्स या तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत.

किंमत किती ?

ओला S1 एयर ची किंमत आधी 79,999 रुपये होती. परंतु 1 जून रोजी सबसिडी मध्ये कपात केल्यानंतर या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत वाढली आहे. आता ओला S1 एयर ची किंमत 109,999 रुपये एवढी झाली आहे. त्याचबरोबर ओला S1 या स्कूटर ची किंमत 129,999 रुपये तर ओला S1 pro ची किंमत 139,999 रुपये एवढी आहे. जर तुम्ही ही स्कूटर आयडीएफसी बँक आणि L and T या फायनान्शियल सर्व्हिसेस यावरून लोन घेऊन ही इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर तुम्हाला कमी इंटरेस्ट रेटवर लोन मिळू शकते. हे लोन 60 महिन्यासाठी 6.99 टक्के व्याजदरावर मिळेल.