OnePlus 12 मोबाईल मार्केटमध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता चिनी मार्केट मध्ये OnePlus 12 हा मोबाईल नुकताच लाँच कऱण्यात आला आहे. काही दिवसांनी भारतात सुद्धा हा मोबाईल लाँच होऊ शकतो. OnePlus 12 या स्मार्टफोनमध्ये ग्लास सँडविच डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीने हा मोबाईल मेटल फ्रेम वर डेव्हलप केला असून या स्मार्टफोनमध्ये 9140mm² वेपर चेंबर  VC कूलिंग सिस्टीम मिळते. हा मोबॅबिल IP65 डस्ट आणि स्प्लेश रेसिस्टेन्स ऑफर करतो. कंपनीने सध्या तरी हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला असून या स्मार्टफोनची विक्री 11 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. हा मोबाईल ग्लोबल आणि भारतीय मार्केटमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होईल. 

   

 स्पेसिफिकेशन  

OnePlus 12 मध्ये OnePlus 11 पेक्षा बरेच बदल करण्यात आले आहे. तरी देखील हा स्मार्टफोन ONEPLUS 11 सोबत मिळता जुळता आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये 6.82  इंच OLED कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3160 x1440 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. आणि 120  hz रिफ्रेश रेट सोबतच  550 ppi पिक्सल डेन्सिटी आणि 4500 nits ब्राईटनेस देतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित ColorOS 14 वर काम करतो. मोबाईल मध्ये 5400 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 100 W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. एवढेच नाही तर हा स्मार्टफोन 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

कॅमेरा- OnePlus 12

OnePlus 12 या स्मार्टफोनमध्ये 4th जनरेशन हैसलब्लॅंड कॅमेरा सेटअप मिळेल. त्यानुसार या मोबाईल मध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा, 48 MP  सोनी IMX581अल्ट्रावाईड कॅमेरा, 64 MP ओमनी व्हिजन O64B सह OIS सपोर्ट असलेली पेरिस्कोप लेन्स मिळते. त्याचबरोबर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 32 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus 12 मध्ये क्वालकॉम चे स्नॅपड्रॅगन  8th जेन 3 SOC लेटेस्ट चिपसेट देण्यात आली आहे. ही नवीन चिपसेट  AI फिचर्सने सुसज्ज आहे.

किंमत किती?

OnePlus 12 च्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंट ची किंमत 4299 युआन  म्हणजेच भारतीय चलनानुसार 50,103 रुपये आहे. आणि या मोबाईलच्या टॉप व्हेरिएंट ची किंमत 5799 युआन म्हणजे 67,701 रुपये एवढी असेल. हा स्मार्टफोन ग्रीन, ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येणार आहे.