अरे बाप रे! लॉन्च होण्यापूर्वीच OnePlus 12 R ची किंमत झाली लीक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

TIMES MARATHI | नावाजलेली कंपनी Oneplus लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oneplus च्या या अपकमिंग स्मार्टफोनचं नाव oneplus 12 R आहे. हा स्मार्टफोन 2024 ला लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. त्यामुळेच याची किंमत जाणून घेण्यासाठी ग्राहक आतूर झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय असू शकते या स्मार्टफोनची किंमत.

   

फिचर्स

Oneplus 12 R या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन देखील काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. त्यानुसार हा स्मार्टफोन 6.7 इंच फुल HD OLED डिस्प्ले सह लॉन्च करण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 1240×2772 पिक्सल रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. या स्मार्टफोनमध्ये हाय अँड ग्राफिक्ससाठी एड्रेनो 740 जीपीयू वापरण्यात येऊ शकते. ज्यामुळे गेम खेळत असताना स्मार्टफोन गरम होणार नाही. Oneplus 12 R या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येऊ शकतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, सेकंडरी कॅमेरा आठ मेगापिक्सल, टेली फोटो कॅमेरा 32 मेगापिक्सल, आणि सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल उपलब्ध होऊ शकतो. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 16 जीबी LPPDR5 रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज कंपनी देऊ शकते.

किंमत

oneplus 12 R या स्मार्टफोनमध्ये वन प्लस कडून 5500mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 100W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन स्नॅप ड्रॅगन 8 Gen 2 Soc चिप्स उपलब्ध होऊ शकतो. यासोबतच स्मार्टफोन मध्ये ब्लूटूथ 5.2, यूएसबीसी पोर्ट, एनएफसी यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात. oneplus 12 R हा स्मार्टफोन किफायती किमतीत लॉन्च होऊ शकतो. वन प्लस कंपनी हा स्मार्टफोन 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करू शकते. वन प्लस कंपनीच्या Oneplus 11 R या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये होती. हा स्मार्टफोन 2024 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.