टाइम्स मराठी । भारतातील सर्वात फेमस ब्रँड म्हणून ओळखला जाणारा OnePlus ब्रँडचे बरेच स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये मोबाईल लॉन्च करत असते. लवकरच OnePlus कंपनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्च करणार असलेल्या या स्मार्टफोनचे नाव OnePlus 12 आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग ची तारीख कंपनीने कन्फर्म करत ONEPLUS ACE 3 ची देखील घोषणा केली आहे. OnePlus 12 हा मोबाईल चिनी मार्केटमध्ये ४ डिसेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होईल. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
स्पेसिफिकेशन
OnePlus 12 या नेक्स्ट जनरेशन अपकमिंग स्मार्टफोन मध्ये 6.82 इंच चा BOE X1 OLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट आणि 1440×3168 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करेल. स्मार्टफोनमध्ये देण्यात येणार असलेला डिस्प्ले हा लो टेंपरेचर पॉलीक्रिस्टलाईन ऑक्साईड LTPO डिस्प्ले असेल. हा मोबाईल इन्फ्रारेड सेन्सर सह उपलब्ध होऊ शकतो. यासोबतच हा स्मार्टफोन युजर्स TV चा रिमोट म्हणून देखील वापरू शकतात.
कॅमेरा
OnePlus 12 या नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन मध्ये OIS सपोर्ट सह 50 MP कॅमेरा उपलब्ध करण्यात येऊ शकतो. हा कॅमेरा HYPERTONE ऑप्टिमायझेशन सह T808 कॅमेरा असेल. यासोबतच अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा 48 MP, टेलीफोटो कॅमेरा 64 MP देण्यात येऊ शकतो. हा टेलीफोटो कॅमेरा ओमनीव्हिजन OV64B कॅमेरा असेल. त्याचबरोबर सेल्फी साठी 32 MP फ्रंट कॅमेरा देण्यात येऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये 54000 MAH बॅटरी देण्यात करण्यात येऊ शकते. ही बॅटरी 100 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
प्रोसेसर
OnePlus 12 सिरीजचा स्मार्टफोन हा OnePlus 11 सिरीज पेक्षा अपग्रेडेड असणार आहे. या अपडेटेड ONEPLUS 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो. या सिरीज मध्ये 3.2 पोर्ट आणि 50 W वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध करण्यात येणार आहे. कंपनी 4 डिसेंबरला या OnePlus 12 स्मार्टफोन सोबतच OnePlus ACE 3 देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये जानेवारी महिन्यात लॉन्च होऊ शकतो.