OnePlus 12 या तारखेला होणार लाँच; वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड चे मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता लवकरच OnePlus नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीची 11 सिरीज उपलब्ध आहे. आता OnePlus 12  हा मोबाईल मार्केटमध्ये लॉन्च होईल. 5 डिसेंबरला कंपनी हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. त्यानंतर 2024 मध्ये जानेवारी महिन्यात भारतात देखील हा मोबाईल लॉन्च करण्यात येईल.

   

बॅटरी– OnePlus 12

OnePlus 12 मध्ये OnePlus 11 प्रमाणे 5000 mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 100 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यासोबतच या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल. त्यानुसार 50 W वायरलेस चार्जिंग ला स्मार्टफोन सपोर्ट करेल. हा मोबाईल तूम्हाला ग्रीन, ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येणार आहे.

कॅमेरा किती

OnePlus 12 या स्मार्टफोनमध्ये  4th जनरेशन हैसलब्लॅंड कॅमेरा सेटअप मिळेल. त्यानुसार 50 MP प्रायमरी कॅमेरा, 48 MP  सोनी IMX581अल्ट्रावाईड कॅमेरा, 64 MP ओमनी व्हिजन O64B पेरिस्कोप लेन्स यामध्ये देण्यात येईल. या मोबाईल मध्ये क्वालकॉम चे स्नॅपड्रॅगन  8th जेन 3 SOC लेटेस्ट चिपसेट देण्यात येऊ शकतोय . या नवीन चिपसेटमध्ये  AI फिचर्स मिळतील.