OnePlus Ace 2 Pro लाँच; पाण्यात पडला तरी No Tension, किंमत किती?

टाइम्स मराठी | प्रसिद्ध कंपनी OnePlus ने चीनी मार्केट मध्ये आपला नवा मोबाइल OnePlus Ace 2 Pro आज लाँच केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे मागील वर्षी लाँच झालेल्या Ace Pro चे अपडेटेड व्हर्जन आहे. या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्क्रिन ओली झाली तरी मोबाईल व्यवस्थित चालतो. यापूर्वी हे फिचर फक्त आयफोन मध्ये पाहायला मिळालं होते. OnePlus Ace 2 Pro चे आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये तब्बल 24 GB रॅम मिळतेय. चला या मोबाईलची अन्य फीचर्सही सविस्तर जाणून घेऊयात.

   

6.7-इंच डिस्प्ले, 50 MP कॅमेरा-

OnePlus Ace 2 Pro मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 1600 nits असून OnePlus च्या या मोबाईल मध्ये 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आलाय. वनप्लस Ace 2 Pro मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. हि बॅटरी 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OnePlus Ace 2 Pro मध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus Ace 2 Pro च्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात 5G, WiFi 7, Bluetooth 5.3, GNSS, NFC आणि ड्युअल सिम सपोर्ट, Dolby Atmos ड्युअल स्पीकर यांसारखी वैशिष्टये आहेत. तसेच या मोबाईल मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

किंमत – OnePlus Ace 2 Pro

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास OnePlus Ace 2 Pro ची किंमत त्याच्या RAM नुसार वेगवेगळी आहे. यामध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 2,999 युआन म्हणजेच (सुमारे 34,572 रुपये) आहे. 16GB RAM + 512GB स्टोरेजची किंमत 3,399 युआन म्हणजेच (सुमारे 39,183 रुपये) आहे. तर 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 3,999 युआन म्हणजेच (सुमारे 46,102 रुपये) आहे.