OnePlus Ace 2 Pro ‘या’ दिवशी होणार लाँच; 24GB रॅम अन बरंच काही

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oneplus कडून Oneplus Ace 2 Pro या मोबाईलची लॉन्चिंग डेट कन्फर्म करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16 ऑगस्टला चीनमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीकडून विबोवर या स्मार्टफोन चा टीजर पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या मोबाईलच्या लॉन्चिंगसाठी इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीने शेअर केलेल्या टिझर व्हिडिओमध्ये या स्मार्टफोनचा कलर ऑप्शनचा खुलासा करण्यात आला. त्यानुसार हा स्मार्टफोन टील आणि ग्रे कलर ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात येईल. या टीचर मध्ये स्मार्टफोनचा प्रोसेसर रॅम आणि स्टोरेज बद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

   

कॅमेरा –

टिजर व्हिडिओमध्ये मिळालेल्या माहितीनुसार कंपनी वन प्लस स्मार्टफोन च्या 11 व्या सिरीज मध्ये देण्यात आलेल्या बॅक पॅनलवर सर्क्युलर कॅमेरा मॉड्युल प्रमाणेच Oneplus Ace 2 Pro या स्मार्टफोनमध्ये देखील सेम असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सोनी IMX890 सेन्सरसह 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येऊ शकतो. या सेन्सर ची साईज 1/1.56 इंच एवढी असेल. त्याचबरोबर 48 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा, 32mp टेली फोटो लेंस आणि सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे.

24 GB पर्यंत रॅम –

टीजर व्हिडिओमध्ये कन्फर्म केल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये 24 GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 1 TB UFS 4.0 स्टोरेज देण्यात येऊ शकते. या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो. यामध्ये ऐरो स्पेस ग्रेड सह थ्री डायमेन्शनल कूलिंग सिस्टीम Tingong देण्यात येऊ शकते. या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंच OLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट करेल. यासोबतच डिस्प्लेला 1.5K स्क्रीन रेझोल्युशन देण्यात येणार आहे.

5500 mAh बॅटरी-

Oneplus Ace 2 Pro मध्ये 5500 mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ला सपोर्ट करेल. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर सह अलर्ट स्लाइडर याला देखील स्मार्टफोन सपोर्ट करेल. हा जगातील असा पहिला स्मार्टफोन असेल ज्यामध्ये एरोस्पेस ग्रेड थ्री डायमेन्शनल कूलिंग सिस्टिम देण्यात आले आहे.