OnePlus AI Music Studio : OnePlus ने लॉन्च केले स्वतःचे AI टुल; यूजर्स मिळणार ‘हा’ फायदा

टाइम्स मराठी । आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजेच AI चा वापर प्रचंड वाढला आहे.  बऱ्याच सॉफ्टवेअर रिलेटेड कंपन्यांसोबतच गुगल, एप्लीकेशन मध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आजकाल बरेच कामे हे मिनिटांमध्ये होतात. ज्या कामांसाठी पूर्वी वेळ लागत होता, ते काम एका मिनिटात होत असल्यामुळे AI चलती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता लोकप्रिय स्मार्टफोन ब्रांड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या OnePlus ने स्वतःचे AI टूल लॉन्च केले आहे. OnePlus कंपनीने लॉन्च केलेल्या टूलचे नाव OnePlus AI Music Studio आहे.

   

काय आहे हे टूल– OnePlus AI Music Studio

OnePlus कंपनीने लॉन्च केलेले AI Music Studio हे एक ऑनलाईन टूल आहे. या टूलच्या माध्यमातून युजर्स  AI त्या मदतीने गाणे बनवू शकतात. त्यासाठी AI मदत करणार आहे. एवढेच नाही तर कंपनीकडून AI Music Studio या टूल सोबतच क्रियेटर्सला गिफ्ट जिंकण्याचा चान्स देत आहे. त्यानुसार जर तुम्ही बनवलेले गाणे हे ट्रेंडिंग ला आले तर तुम्हाला कंपनीकडून गिफ्ट मिळू शकेल.

अशा पद्धतीने करते काम

OnePlus AI Music Studio या टूलच्या मदतीने युजर्स AI च्या पावरला युज करू शकतात. आणि स्वतःचे गाणे , व्हिडिओ गाणे बनवण्यासाठी  प्रयत्न करू शकतात. हे AI टूल्स तुम्ही शेअर केलेले गाणे किंवा आयडिया यावर आधारित सॉंग लिहेल. किंवा तयार करेल. तुमचे गाणे पूर्णपणे बनवल्या गेल्यानंतर तुम्ही हे सॉंग सोशल मीडियावर शेअर करू शकतात.

अशा पद्धतीने वापरा हे टूल

OnePlus AI Music Studio हे टूल्स वापरण्यासाठी तुम्हाला  वेबसाईटवर जावे लागेल.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे स्वतःचे अकाउंट बनवून साइन इन करावे लागेल. तुम्ही फ्री मध्ये नवीन अकाउंट बनवू शकतात.
त्यानंतर तुम्हाला स्टाईल मूड आणि म्युझिक व्हिडिओ थीम निवडावी लागेल.
त्यानंतर तुम्ही म्युझिक बद्दल डिटेल्स भरू शकतात.
डिटेल्स भरल्यानंतर तुम्ही जनरेट बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला म्युझिक तयार करून मिळेल. 
AI च्या मदतीने तयार करून मिळालेले म्युझिक तुम्ही चेक करू शकतात.
चेक केल्यानंतर तुम्हाला म्युझिक आवडत नसेल तर पुन्हा एडिट करण्याचे देखील ऑप्शन यामध्ये आहे.