OnePlus Mobile : 16GB रॅमसह OnePlus ने लाँच केले 2 आकर्षक मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

OnePlus Mobile । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OnePlus ने भारतात २ दमदार मोबाईल लाँच केले आहेत. OnePlus 12 आणि OnePlus 12R अशी या दोन्ही मोबाईलची नावे असून यापूर्वी हे स्मार्टफोन कंपनीने चीन मध्ये लाँच केले होते. OnePlus 12 ची भारतात सुरुवातीची किंमत 64,999 रुपये आहे. तर OnePlus 12R ची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे. आज आपण या दोन्ही मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात…

   

OnePlus 12 चे फीचर्स –

OnePlus 12 मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट सहा 6.82-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 2K रिझोल्यूशन आणि 4,500 Nits पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने या मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट बसवली असून तुम्हाला या मोबाईल मध्ये AI फीचर्स सुद्धा मिळतात. मोबाईलच्या (OnePlus Mobile) कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OnePlus 12 मध्ये 50 MP प्राथमिक कॅमेरा आहे. 48 MP वाइड अँगल, 3X ऑप्टिकल झूमसह 64 MP टेलिफोटो कॅमेरा आणि 48 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5,400mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा मोबाईल 16GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.

OnePlus 12R चे फीचर्स – OnePlus Mobile

OnePlus 12R मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट सह 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1.5K रिझोल्यूशन आणि 4,500 nits पीक ब्राइटनेस सह येतोय. OnePlus 12R मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट बसवण्यात आली आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास,OnePlus 12R मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तर समोरील बाजूला 16 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.