दिवाळी ऑफर!! OnePlus चे Mobile मिळतायत अगदी स्वस्तात

टाइम्स मराठी । दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच दिवाळी निमित्त बरेच ग्राहक खरेदीची तयारी करत आहे. भारतामध्ये दिवाळीला वाहन, सोने आणि स्मार्टफोन खरेदी याकडे जास्त लक्ष दिले जाते. त्यानुसार दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी  वेगवेगळ्या प्रॉडक्ट वर डिस्काउंट ऑफर दिले जातात. तुम्ही यंदा OnePlus कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दिवाळी फेस्टिवल साठी कंपनीने फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि नोट स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट ऑफर उपलब्ध केला आहे. जाणून घेऊया या ऑफर.

   

OnePlus Open –

OnePlus ब्रँड चा स्मार्टफोन हा तरुणांना जास्त आकर्षित करतो. तुम्ही दिवाळीला OnePlus ब्रँड चा नुकताच लॉन्च झालेला OnePlus Open हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळू शकतो. एवढेच नाही तर १२ महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI ऑप्शन देखील कंपनीने उपलब्ध केले आहे. यासोबतच काही मोबाईलवर एक्सचेंज ऑफर देखील कंपनी देत आहे. एक्सचेंज ऑफरनुसार ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे.

OnePlus 11 5G आणि OnePlus 5G Marble ODC

OnePlus 11 5G आणि OnePlus Marble ODC खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बँक ऑफरनुसार तीन हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनवर 4000  रुपयांपर्यंत स्पेशल कुपन देखील उपलब्ध आहे. यासोबतच बारा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑप्शन स्मार्टफोन वर देण्यात येत आहे. OnePlus Marble ODC हा मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 18 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑप्शन उपलब्ध केले आहे.

OnePlus 11R 5G आणि OnePlus 11R Solar Red Special Edition

OnePlus 11R 5G आणि OnePlus 11R Solar Red Special Edition या दोन्ही स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना 2000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देण्यात येत आहे. यासोबतच 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI देखील यावर उपलब्ध आहे.

OnePlus 10 Pro 5G आणि OnePlus 10T 5G

OnePlus 10 Pro 5G आणि OnePlus 10T 5G या दोन्ही स्मार्टफोनवर अनुक्रमे  14000 आणि 10,000 रुपयांपर्यंत स्पेशल कुपन मिळत आहे. यासोबतच 5000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देखील कंपनीकडून दिला जात आहे. त्याचबरोबर ग्राहक 12 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI चा लाभ देखील घेऊ शकतात. OnePlusकंपनीचा फ्लॅटशिप स्मार्टफोन वर उपलब्ध करण्यात येणाऱ्या ऑफर या  ICICI बँक आणि ONECARD ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यानुसार ग्राहक हे स्मार्टफोन OnePlus एक्सपिरीयन्स स्टोअर्स, ऑनलाइन वेबसाईट, अमेझॉन वरून खरेदी करू शकतात.

OnePlus Nord

OnePlus Nord 3 5G हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3000 रुपयांचे स्पेशल कुपन यासह 3000 रुपयांची बँक डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. नो कॉस्ट EMI ऑप्शन देखील या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. तुम्ही देखील हा स्मार्टफोन नो कॉस्ट EMI ऑफर नुसार खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 3 आणि OnePlus Nord CE 3 LITE

OnePlus Nord CE 3  हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2500 रुपयांचे स्पेशल कुपन आणि 2000 रुपयांचा बँक डिस्काउंट देण्यात येत आहे. OnePlus Nord CE 3 LITE  या स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या माध्यमातून 1500 रुपयांचे बँक ऑफर कंपनीकडून दिली जात आहे.