OnePlus चा जबरदस्त मोबाईल; 12 GB रॅम, किंमतही कमी

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये आजकाल वेगवेगळ्या ब्रँडचे, अप्रतिम कॉलिटी मध्ये स्मार्टफोन उपलब्ध आहे. यासोबतच OnePlus कंपनीचा स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा मोबाईल दमदार फीचर्स मध्ये उपलब्ध आहे. OnePlus कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनचे नाव OnePlus Nord 2T 5G असं आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीमध्ये लॉन्च केला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

OnePlus Nord 2T 5G या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच चा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  1080×2400 पिक्सेल रिझोल्युशन आणि 90 hz रिफ्रेश रेटसह येतो. या मोबाईल मध्ये देण्यात आलेल्या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 एवढा आहे. तसेच OnePlus चा मोबाईल अँड्रॉइड 14 वर काम असून यामध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 720g प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा

OnePlus Nord 2T 5G या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच 16 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा मायक्रो लेंसकॅमेरा या मोबाईल मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे. OnePlus च्या या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अप्रतिम फोटोग्राफी करू शकता. OnePlus Nord 2T 5G मध्ये 4500 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

OnePlus Nord 2T 5G या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज वरिएंट उपलब्ध आहे. यामध्ये यामध्ये 8GB + 256GB स्टोरेज आणि 12GB + 512GB स्टोरेज व्हेरियेण्टचा समावेश आहे. भारतीय बाजारात या मोबाईलची सुरुवातीची किंमत 14, 999 रुपये इतकी आहे.