फक्त 2298 रुपयांत मिळतोय Oneplus चा Mobile; पहा कुठे आहे ऑफर

टाइम्स मराठी । सध्या भारतात सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे. ग्राहकांना स्वस्तात वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून ॲमेझॉनने जवळपास २५ हजार वस्तूंवर बम्पर सूट दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, स्मार्ट TV यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. उद्या म्हणजेच १६ ऑक्टोबर पर्यंतच तुम्हाला या सेलचा लाभ घेता येणार आहे. तुम्ही जर नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर Oneplus Nord CE 3 5G या स्मार्टफोनवर Amazon ने मोठा डिस्काउंट ठेवला आहे. त्यानुसार तुम्ही 18 हजार रुपयांपेक्षा सुद्धा अगदी कमी किमतीत हा मोबाईल खरेदी करू शकता.

   

काय आहे ऑफर?

Oneplus Nord CE 3 5G हा मोबाईल 26,998 रुपयांत उपलब्ध आहे. परंतु ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये या मोबाईल च्या खरेदीवर २००० रुपयांचे कुपन मिळत आहे. तसेच SBI च्या क्रेडिट कार्डवर १२५० रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्हाला तब्बल २४, ७०० रुपये सूट मिळू शकते. या सर्व गोष्टींचा विचार केला असता तुम्ही अवघ्या २२९८ रुपयांत खरेदी करू शकता. परंतु एक्सचेंज करणारा मोबाईल सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये असं आवश्यक आहे.

Oneplus Nord CE 3 स्पेसिफिकेशन

Oneplus Nord CE 3 या स्मार्टफोनच्या फिचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच FHD, AMOLD डिस्प्ले देण्यात आलेला असून 950 निट्सब्राईटनेस मिळतो. मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आलेली असून ती 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. Oneplus Nord CE 3 मध्ये क्वलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड OxigenOS 13.1 वर चालतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 MP चा अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सल मायक्रो सेन्सर मिळतो. याशिवाय समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.