OnePlus Nord N30 SE 5G : OnePlus ने लाँच केला स्वस्तात मस्त मोबाईल; 14 हजारपेक्षा कमी किंमत

OnePlus Nord N30 SE 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OnePlus ने मार्केट मध्ये ग्राहकांना परवडेल अशा किमतीत स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. OnePlus Nord N30 SE 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये तुम्हाला अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने हा मोबाईल काळा आणि निळा अशा २ रंगात लाँच केला आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

6.72-इंचाचा डिस्प्ले –

OnePlus Nord N30 SE 5G मध्ये कंपनीने 6.72-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. मोबाईल मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6020 चिपसेट बसवण्यात आली असून OnePlus चा हा मोबाईल Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर वर्क करतो. स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये 4GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा – OnePlus Nord N30 SE 5G

कोणताही मोबाईल खरेदी करत असताना आपण त्यामध्ये देण्यात आलेल्या कॅमेराबद्दल नेहमीच उत्सुकतेने बघत असतो. त्याचप्रमाणे OnePlus Nord N30 SE 5G च्या कॅमेराबद्दल सांगायचं झालयास यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ लेन्स सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय विडिओ कॉल आणि सेल्फी साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेल कॅमेरा मिळतो. पॉवर साठी स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

OnePlus Nord N30 SE 5G हा मोबाईल सध्या तरी भारतात नव्हे तर UAE मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 13,560 रुपये इतकी आहे. त्यामुळे बजेट मध्ये मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हा मोबाईल खरेदी करणं परवडेल. कंपनीने हा स्मार्टफोन निळ्या आणि काळ्या रंगात लाँच केला आहे. येत्या काही दिवसात हा मोबाईल भारतीय बाजारपेठेत सुद्धा येण्याची शक्यता आहे.