OnePlus Open : OnePlus ने लाँच केला पहिला फोल्डेबल Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | प्रसिद्ध मोबाईल कंपनी OnePlus ने अप्रतिम फीचर्स सह नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा हा पहिलावहिला फोल्डेबल स्मार्टफोन असून 2 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मुंबईमध्ये ओपन फॉर एवरीथिंग या इव्हेंट दरम्यान लॉन्च करण्यात आला. OnePlus Open असे या मोबाईलचे नाव आहे. हा स्मार्टफोन कंपनीने एमराल्ड ग्रीन आणि वोयाजर ब्लॅक या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. जाणून घेऊया या मोबाइलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत….

   

स्पेसिफिकेशन

OnePlus Open मध्ये 120 hz रिफ्रेशरेट सह 7.82 इंचचा डिस्प्ले मिळतो. यामध्ये तुम्हाला 2440 × 2268 पिक्सेल रिझोल्युशन मिळेल. त्याचबरोबर स्मार्टफोनच्या एक्स्टर्नल स्क्रीनवर म्हणजेच फोल्ड केल्यावर हा स्मार्टफोन 6.31 इंचच्या AMOLED पॅनल डिस्प्ले मध्ये येतो. आणि जेव्हा तुम्ही हा स्मार्टफोन पूर्णपणे ओपन करतात तेव्हा 7.82 इंच डिस्प्ले दिसतो. या मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आले आहे.

कॅमेरा– OnePlus Open

मोबाईल च्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, OnePlus Open मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार बॅक पॅनलवर 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सल सेकंडरी शूटर , आणि 64 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर फ्रंट मध्ये 32 मेगापिक्सल आणि 20 मेगापिक्सल असे 2 कॅमेरा तुम्हाला दिसतील. या स्मार्टफोन मध्ये 4808 mAh बॅटरी उपलब्ध करण्यात आली आहे. आणि ही बॅटरी 100 w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

किंमत

OnePlus Open हा वनप्लस कंपनीचा स्मार्टफोन 1,39,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनची प्री बुकिंग 19 ऑक्टोबर पासून ऑफिशियल वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे.