OnePlus लवकरच लाँच करणार परवडणारा फोल्डेबल Mobile; काय फीचर्स मिळणार?

टाइम्स मराठी । वनप्लस लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन आता 19 ऑक्टोबरला लॉन्च होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी ह्या स्मार्टफोन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लॉन्च करण्यात येणार होता. परंतु अजूनही हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेला नाही. नुकतच या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग डेटचा खुलासा झालेला असून याबाबत OnePlus चे सीईओ रॉबिन लियू यांनी माहिती दिली आहे. One Plus Open असे या मोबाईलचे नाव आहे. या मोबाईल मध्ये काय फीचर्स मिळतील ते जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

One Plus Open हा एक फोल्डरेबल स्मार्टफोन असल्याचा उघड झालं आहे. यामध्ये 7.8 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश सह येईल. त्याचबरोबर स्मार्टफोनच्या एक्स्टर्नल स्क्रीनवर 6.3 इंच चा AMOLED पॅनल उपलब्ध होऊ शकते. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट प्रदान करेल अशी आशा आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात येऊ शकते.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, One Plus Open या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सल सेकंडरी शूटर आणि 64 मेगापिक्सल लेन्स देण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर फ्रंट मध्ये 32 मेगापिक्सल आणि 20 मेगापिक्सल असे २ कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन मध्ये 4800 mAh बॅटरी उपलब्ध करण्यात येऊ शकते. आणि ही बॅटरी 100 w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

किंमत

One Plus Open हा वनप्लस कंपनीचा किफायती किमतीत उपलब्ध असलेला फोल्डेबल फोन असण्याची शक्यता आहे. हा फोन भारतामध्ये 1,10,000 ते 1,20,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करण्यात येऊ शकतो. हा मोबाईल 19 ऑक्टोबरला लॉन्च होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.