OnePlus Pad GO टॅबलेट भारतात लाँच; 8000mAh ची दमदार बॅटरी

टाइम्स मराठी । वनप्लस कंपनीचा OnePlus Pad GO टॅबलेट भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे.  हा टॅबलेट  Xiaomi आणि Realme यासारख्या ब्रँडेड टॅबलेट्सला टक्कर देतो. कंपनीने हा टॅबलेट पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये दमदार बॅटरी देण्यात आली असून हा टॅबलेट  स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा टॅबलेट खरेदी करू इच्छित असाल तर 12 ऑक्टोबरला बारा वाजता  तुम्ही वनप्लस च्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲमेझॉन इंडिया वरून प्री बुक करू शकता.

   

स्पेसिफिकेशन

OnePlus Pad GO या टॅबलेट मध्ये 11.35 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन आणि  HDR 10 + ला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले  2.4 k रिझोल्युशन आणि 144  hz रिफ्रेश रेट सह येतो. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशो 7.5 एवढा आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड 13 वर बेस्ड OXYGENOS 13.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यामध्ये  हेलियो G99 ऑक्टा कोर प्रोसेसर सोबतच Mali G57 MP2 GPU उपलब्ध आहे.

कॅमेरा– OnePlus Pad GO

कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OnePlus Pad GO या टॅबलेट मध्ये 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच टॅबलेटच्या फ्रंट मध्ये देखील आठ मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे. या टॅबलेट मध्ये 8000 MAH बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. PAD GO या टॅबलेट मध्ये LTE, 5G, ब्लूटूथ 5.3, जीपीएस, वाय-फाय 6, यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती-

OnePlus Pad GO टॅबलेट मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज उपलब्ध आहे. कंपनीने या टॅबलेट मध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध केले आहे.  त्यानुसार 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वायफाय व्हेरीएंट ची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. आणि  LTE मॉडेल ची किंमत 21,999 रुपये आहे. तसेच 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज LTE व्हेरीएंटची किंमत 23 हजार 999 एवढी आहे.