OnePlus लॉन्च करणार नेक्स्ट जनरेशन OnePlus 12 सिरीज’; वायरलेस चार्जिंगला करेल सपोर्ट

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या OnePlus या ब्रँडचा मोबाईल तरुण पिढीला आकर्षित करत असतो. आता लवकरच OnePlus हा ब्रँड नेक्स्ट जनरेशन OnePlus 12 सिरीज लॉन्च करणार आहे. OnePlus कडून अजूनही या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख स्पष्ट करण्यात आली नसली तरी देखील लवकरच हा मोबाईल तुम्हाला बाजारात दिसू शकेल. या न्यू जनरेशन मोबाईल मध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध असेल. हे OnePlus चे अपडेटेड व्हर्जन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

   

टीपस्टर या डिजिटल चॅट स्टेशन च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार OnePlus 12 वी सिरीज ही वनप्लस 11 सिरीज पेक्षा अपग्रेडेड असू शकते. या अपडेटेड OnePlus 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो. वन प्लस 11 हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीलाच लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने वायरलेस चार्जिंग सपोर्ट लॉन्च केला नव्हता. परंतु आता वनप्लस 12 सिरीज मध्ये 3.2 पोर्ट आणि 50 W वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध करण्यात येणार आहे.

स्पेसिफिकेशन

OnePlus 12 या नेक्स्ट जनरेशन अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच चा QHD + कर्व्ह डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट आणि 1440×3168 पिक्सल रिझोल्युशन प्रदान करेल. स्मार्टफोनमध्ये देण्यात येणार असलेला डिस्प्ले हा लो टेंपरेचर पॉलीक्रिस्टलाईन ऑक्साईड LTPO डिस्प्ले असेल. या मोबाईल मध्ये इन्फ्रारेड सेन्सर मिळेल. तुम्ही हा मोबाईल TV चा रिमोट म्हणून देखील वापरू शकता.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास या नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन मध्ये OIS सपोर्ट सह 50 मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध करण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा 48 मेगापिक्सेल, आणि 64 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात येऊ शकतो. हा टेलीफोटो कॅमेरा ओमनीव्हिजन OV 64B कॅमेरा असेल. त्याचबरोबर सेल्फी साठी 32 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येऊ शकतो.